Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

समाजकार्य महाविद्यालय, अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, समाजकार्याचा विद्यार्थी केंद्र सरकारच्या कॅग मध्ये लेखाधिकारी (A Feather in the Cap of the College of Social Work, Amravati: Social Work Student Appointed as Accounts Officer in the Central Government's CAG.)

समाजकार्य महाविद्यालय, अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, समाजकार्याचा विद्यार्थी केंद्र सरकारच्या कॅग मध्ये लेखाधिकारी (A Feather in the Cap of the College of Social Work, Amravati: Social Work Student Appointed as Accounts Officer in the Central Government's CAG.)
 

अमरावती :- मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथील रहिवासी भावेश वर्षा अनिल वानखडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या संस्थेत यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षांमधून त्यांनी कॅग (Comptroller and Auditor General of India) या संस्थेत लेखाधिकारी (Accountant) हे पद वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. भावेश यांनी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय, अमरावती येथून २०२४ मध्ये बी.एस.डब्ल्यू ही पदवी पूर्ण केली. समाजकार्य शिक्षण घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूचं ठेवली आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. भावेश यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे वडील वीट भट्टीवर मजुरीचे काम करतात, तर आई सूतगिरणीत कामगार म्हणून कार्यरत आहे. 


            अशा परिस्थितीतही भावेश यांनी आपले स्वप्न सोडले नाही आणि चिकाटी, मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. भावेशच्या यशाबद्दल विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी, अमरावतीचे मा. अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष ॲड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिंगजी चौधरी, कार्यकारिणी सदस्य श्री. नितीनजी हिवसे, डॉ. पुनमजी चौधरी, श्री. पंकजजी देशमुख, प्रा. विनयजी गोहाड, प्रा. गजाननजी काळे व समाजकार्य महाविद्यालय, अमरावती येथील प्राचार्य डॉ. राजकुमार दासरवाड इत्यादी मान्यवरानी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह भावेशच्या यशाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. भावेश यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या