चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नवी झेप, ‘माय फर्स्ट डिक्शनरी’ व डीजीटल वर्गखोलीचे लोकार्पण (A New Leap in Education in Chandrapur District: Dedication of ‘My First Dictionary’ and Digital Classrooms)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नवी झेप, ‘माय फर्स्ट डिक्शनरी’ व डीजीटल वर्गखोलीचे लोकार्पण (A New Leap in Education in Chandrapur District: Dedication of ‘My First Dictionary’ and Digital Classrooms)

चंद्रपूर -: जिल्हा परिषद व बल्लारपूर येथील पेपर मील यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल घडविणारा ‘माय फर्स्ट डिक्शनरी’ व डीजीटल वर्गखोलीचा शुभारंभ जि. प. प्राथमिक शाळा, इटोली (ता. बल्लारपूर) येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, बिल्ट ग्राफिक पेपर प्रोडक्ट्स लिमिटेडचे युनिट हेड उदय कुकडे, महाव्यवस्थापक प्रवीण शंकर, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनावणे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, इटोलीचे सरपंच तुळशीदास पिपरे, ग्रामसेवक विकास बोरेवार तसेच मुख्याध्यापिका पुष्पलता दरेकर उपस्थित होते.

           ‘माय फर्स्ट डिक्शनरी’ प्रकल्पांतर्गत 15 तालुक्यांमधील इयत्ता 5 वी ते 5 वी तील सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशाचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्दसंपदा, वाचन-लेखन कौशल्ये आणि भाषिक आत्मविश्वास वाढून त्यांच्या शैक्षणिक व करिअर संधींना भक्कम आधार मिळणार आहे. तसेच पेपर मीलच्या सामाजिक दायित्व निधीतून इटोली, नांदगाव पोडे व विसापूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम उभारण्यात आले असून स्मार्ट बोर्ड, संगणक व ऑडिओ-व्हिज्युअल साधनांमुळे अध्यापन अधिक प्रभावी, संवादात्मक आणि आकर्षक झाले आहे.
हा उपक्रम पारंपरिक शिक्षण पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, स्पर्धात्मक व भविष्योन्मुख शिक्षणासाठी सक्षम करणारा ठरणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)