गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. येथील 'सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर' (SRC) मधील दोन विद्यार्थ्यांची बंगळुरू येथील नामांकित 'अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी' मध्ये एम.ए. (Applied Economics) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. प्रशिक धवळे आणि समीर इंदूरकर अशी या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांच्या या यशाने गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यशाचा मार्ग सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटरची साथ अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवणे हे मोठे आव्हान असते. मात्र, सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटरने या विद्यार्थ्यांना दिलेले योग्य मार्गदर्शन, इंग्रजी संभाषण कौशल्य विकास आणि स्पर्धात्मक वातावरणाने हे यश सुकर झाले आहे. हे सेंटर गडचिरोलीतील ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोफत मार्गदर्शन पुरवण्याचे मोलाचे कार्य करत आहे.
विद्यार्थ्यांच्या यशावर कौतुकाचा वर्षाव या यशाबद्दल सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटरच्या वतीने प्रशिक आणि समीर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) शिक्षण घेऊन आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन करावे, असा मानस सेंटरने व्यक्त केला आहे. एसआरसी गडचिरोलीचे आवाहन सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर हे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. गडचिरोलीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि उच्च शिक्षणासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशिक आणि समीर यांच्या या यशामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

0 टिप्पण्या