Advertisement

Responsive Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँगेसची भूमिका ? (Dr. Babasaheb Ambedkar and The role of Congress ?)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँगेसची भूमिका ? (Dr. Babasaheb Ambedkar and The role of  Congress ?)

वृत्तसेवा :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत जाण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी दारेच नाही तर खिडक्या सुद्धा बंद केलेल्या होत्या… याची माहिती जेव्हा बंगाल मधील अस्पृश्य नेते जोगेंद्रनाथ मंडल यांना समजली तेव्हा त्यांना खुप दुःख झाले… जोगेंद्रनाथ मंडल हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९३२ मध्ये इंग्रजांकडून गोलमेज परिषदेत मिळालेल्या शिक्षणाचे लाभार्थी होते त्यांनी अस्पृश्यांना शिक्षण सरकारी नोकऱ्या आणि राजकीय जागा बंगाल मध्ये मिळविण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते… बंगाल मध्ये चांडाळ म्हणजेच नमोशूद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्पृश्य जातीचे ते नेते होते… ज्यांनी आपल्याला शिक्षण, नोकऱ्या आणि राजकीय अधिकार मिळवून दिले त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संविधान संविधान सभेत जाण्यासाठी त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी दिल्ली वरुण मुंबईत आले आणि त्यांनी सदरील हकीकत बाबासाहेबांना सांगितली… आणि त्यांनी बाबासाहेबांना बंगाल मधील जैसोर खुलना मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी निमंत्रित केले…१९४६ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ठरल्याप्रमाणे जैसोर खुलना मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली… देशाच्या पश्चिम किनाऱ्यातील एखादा व्यक्ती देशाच्या पूर्व किनाऱ्यावर निवडणूक लढण्यासाठी आपली उमेदवारी दाखल करतो हे सर्वात आश्चर्यकारक होते… जी काँग्रेस बाबासाहेबांना संविधान सभेत न येण्यासाठी तयारीत होती त्या अगोदरच एक परिपक्व राजकीय डावपेच आखून विरोधकला आपल्या डावपेचाची माहिती होऊ न देता बाबासाहेबांनी आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी काँगेस चा विरोधी पक्ष मुस्लिम लीग यांच्याशी आघाडी करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बहुमताने संविधान सभेत निवडून पाठविले… त्यासाठी जैसोर खुलना मतदार संघातील मतदारांचे उपकार फिरणारे नाहीत… त्या उपकाराची परतफेड आजही आम्ही आंबेडकरी जनता करु शकलो नाही याची खंत वाटते…
             डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून देण्याची त्या मतदार संघाला आणि तिथल्या मतदारांना देशातून बाहेर काढून देण्याची शिक्षा मिळाली… ती अशी की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जैसोर खुलना मतदारसंघातून १९४६ मध्ये निवडून गेले… निवडून गेल्यावर त्यांना स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याचे काम करायचे होते… डॉ बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित असल्याने आपल्या मनासारखे संविधान निर्माण करता येणार नाही याची कल्पना काँग्रेसच्या नेत्यांना होती त्यातल्या त्यात सर्व दारे आणि खिडक्या बंद केलेल्या असल्यानंतर सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानसभेत प्रवेश मिळविलेला होता… हा काँग्रेसचा पराभव त्यांचा नेत्यांच्या जिव्हारी लागला… आणि काँग्रेस ने पुन्हा कपटी राजकारण करुन मुस्लिम समाजाची आजपर्यंत पुर्ण न केलेली मागणी स्वतंत्र देशाची मागणी १९४७ मध्ये मान्य केली… आणि करारानुसार ज्या भागात ५०% पेक्षा जास्त हिंदू असतील तो भाग भारतात आणि ५०% पेक्षा जास्त मुस्लिम असतील तो भाग पाकिस्तान ला देण्याचे ठरले… त्यानुसार सीमा आखणी झाली पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मतदारसंघात ६५% हिंदू असताना तो मतदारसंघ पाकिस्तान मध्ये समाविष्ट करण्यात आला…. आणि तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी बाबासाहेबांना पाकिस्तान चे संविधान तयार करा असा सल्ला दिला… आणि जैसोर खुलना मतदारसंघातील मतदारांना भारतात शरणार्थी जीवन जगावे लागले… त्यांना ना पाकिस्तान मध्ये सन्मान मिळाला ना भारतात समाविष्ट करण्यात आले… या फाळणी मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर संतापले आणि त्यांनी संविधान सभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला… आणि तडक इंग्लंडचे मुख्य विरोधी पक्षनेते विन्स्टन चर्चिल यांना भेटले आणि इंग्लंडच्या सभागृहात भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जी योजना आखली होती ती काँग्रेस कशा पद्धतीने मोडीत काढून एकाच जातीच्या लोकांना कसे सरकार मध्ये राहता येईल हा डाव आखत आहेत हे निवेदन दिले… त्यानुसार इंग्लंडच्या सिनेट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या निवेदनावर तत्कालीन विरोधीपक्ष नेते विन्सेंट चर्चिल यांनी जो पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा संविधान सभेत घेण्यात येणार नाही तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य देण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली… त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसला नाईलाजास्तव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईतून जयकर यांचा राजीनामा घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडणून आणावे लागले आणि त्यांना संविधान सभेत ड्राफ्टींग कमिटीचा अध्यक्ष म्हणून निवडावे लागले… डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला नुसते संविधानाच दिले असे नाही तर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच कारणीभूत आहेत… 
              डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य १९२० पासून इंग्रज बघत होते… त्यांना गोलमेज परिषदेत येण्याचे निमंत्रण, बाबासाहेबांची गोलमेज परिषदेतील भुमिका, पुणे करार, भारत सरकार मधील त्यांचे काम, त्याच्या चळवळी, त्यांचा राजकीय प्रवास, त्यांचे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, समानता, न्यायची भूमिका आजपर्यंत कुणीच खोडून काढू शकले नाहीत… त्यांची विद्वत्ता भारताला खूप कमी वेळेत प्रगतीपथावर घेऊन आलेली आहे… तरीही बांडगुळ मनुवादी त्यांना नाकारण्याचा प्रयत्न आजही करत आहेत… हे तेच लोकं आहेत ज्यांनी कधी बाबासाहेबांना संविधान सभेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते… त्याच मानसिकतेचे लोकं आजही बाबासाहेबांनी तयार केलेले संविधान संपविण्यासाठी काम करत आहेत… ते काल काँग्रेस मध्ये होते आज आर एस एस आणि बीजेपी मध्ये आहेत… बाकी मानसिकता तीच आहे… त्यांना आजही एका अस्पृश्याने संविधान तयार केले हेच पचनी पडत नाही म्हणून ते आजही संविधानाला मनात नाहीत… संविधान बदलण्यासाठी ते निकराचा प्रयत्न करत आहेत… संविधान कसे कुचकामी आहे हे दाखविण्यासाठी जनतेला त्रास देऊन संविधानाच्या विरोधात उभे करत आहेत… संविधानाची योग्य अंमलबजावणी झाली नाही की जनता संविधान बदलण्यासाठी पुन्हा निवडून देईल अशी यांची मानसिकता आहे… जाणिवपूर्वक संवैधानिक संस्था मोडकळीस आणल्या जात आहे… त्यांना कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्यापासून रोखण्यात येत आहे… न्यायसंस्था पूर्णपणे मोडकळीस आणलेली आहे… मिडिया विकत घेऊन यांना कुणी प्रश्न विचारणार नाही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे… सरकार जनतेला कुठल्याच सुविधा देण्यासाठी तयार नाही… एकूण संविधान संपले की पुन्हा या देशात मनुस्मृती लागू करायची आहे… जी १९४७ मध्ये कायद्याने संपविण्यात आली होती ती पुढच्या २०४७ मध्ये लागू करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे… म्हणून प्रत्येक भारतीयाला पुन्हा गुलाम बनण्याचे नसेल तर आपले संविधान आणि पर्यायाने आपला देश आणि आपले स्वातंत्र्य वाचविण्यासाठी तत्पर असावे…

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या