चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या पोनि आसिफराजा शेख रामनगर पोलीस स्टेशन मधून राजुऱ्यात तर प्रभावती एकुरके जिल्हा विशेष शाखेतून रामनगर येथे बदली (Administrative transfers of police inspectors in Chandrapur district from PI Asifaraja Sheikh Ramnagar to Rajura and Prabhavati Ekurke from District Special Branch to Ramnagar.)
चंद्रपूर :- राज्य शासनाच्या सन २०१५ च्या महाराष्ट्र अध्यादेश तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा बदली आस्थापना मंडळाच्या सर्वानुमते या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनिक कारणास्तव या बदल्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय फेरबदल करत पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची राजुरा येथे, तर पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके यांची रामनगर पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची पोलीस स्टेशन रामनगर येथून पोलीस स्टेशन राजुरा येथे बदली करण्यात आली असून ही बदली पोलीस निरीक्षक सुमित परतेको यांना कार्यमुक्त केल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे यांची पदोन्नतीनंतर जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे पदस्थापना करण्यात आली आहे. पदोन्नतीवर हजर झाल्यामुळे संबंधित जागा रिक्त झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके (जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर) यांची पोलीस स्टेशन रामनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेच्या कामकाजात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या