चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या इयत्ता 10 वी व 12 वी मधील पात्र खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण प्रदान करण्यात येतात. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा सवलत गुण प्रस्ताव सादर करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सदर प्रस्ताव शासनाच्या "आपले सरकार" पोर्टलद्वारे (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभाग व प्रावीण्यानुसार दिले जाणारे क्रीडा सवलत गुण प्रस्ताव यावर्षीपासून शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे केवळ ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. यापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांमार्फत व्हायची. परंतु चुकांमुळे काही विद्यार्थी वंचित राहायचे. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीयस्तरावरील क्रीडा स्पर्धांमधील सहभाग किंवा प्राविण्यासाठी सवलत गुण अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच आपले सरकार अप अथवा पोर्टलच्या माध्यमातून सादर करावा. अर्जाची प्रत आपले सरकार पोर्टलद्वारे सर्वप्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व त्यानंतर महाराष्ट्र राज्य ज माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास पोहोचेल. त्यामुळे विद्याथ्यांनी किवा शाळांनी प्रत्यक्षपणे अर्ज करू नये. आपले सरकार पोर्टल, अॅपवर लॉगिन करून अर्ज भरणे, खेळ व प्रमाणपत्रांची माहिती अपलोड करणे, विहित कालावधीत अर्ज सादर करणे, अर्जाची स्थिती पोर्टलवर नियमित तपासणे याबद्दलची नोंद शाळा व महाविद्यालयाच्या शिक्षकांनी घ्यावी. क्रीडा सवलत गुणांसाठी सर्व संबंधितांनी आपले सरकार पोर्टलद्वारेच ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या