नागपूर :- नागपूरातील मनीषनगरातील एका हॉटेलमध्ये एक युवती आणि एक युवक रक्ताच्या थारोळ्यात सापडले. दोघांच्याही शरीरावर चाकूचे अनेक घाव असल्याने हा हत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान, मंगळवारी रात्री उघड झालेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. मृत युवतीचे वय २८ वर्ष असून ती अजनीतील शताब्दी चौकात राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, गंभीर जखमी असलेल्या संशयिताचे वय अंदाजे २८ ते ३० दरम्यान असून जखमी मुलगा अजनीच्या रेल्वे वसाहतीत राहतो. मनीष नगरातील अजित बेकरीमागे हॉटेलच्या ज्या रूममध्ये हा थरार घडला, त्या रुममधील दृश्य भीषण होते. एकीकडे रूममधील बेड गुलाबांच्या पाकळ्यांनी सजविला होता. तर, दुसरीकडे सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. शरीरावर चाकूचे अनेक घाव असलेली तरुणी निपचित पडून होती. तिची भांग रक्ताने भरलेली होती. गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे दिसून येत होते. तर शेजारीच तरुण देखील जखमी अवस्थेत पडून होता. त्यावरून आरोपीने स्वतःला जखमी करून तिच्या भांगेत कुंकूऐवजी स्वतःचे रक्त लावले असावे, असा अंदाज आहे. आज हे दोघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी रूम भाड्याने घेतली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास अचानक त्यांच्या रूममधून किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. - परिणामी बाजूच्या रूमसह हॉटेल व्यवस्थापनाने तिकडे धाव घेतली. आतमध्ये तरुण व तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. बाजूलाच चाकू पडून होता. हे दृश्य पाहून हॉटेल व्यवस्थापनाने बेलतरोडी पोलिसांना कळविले. पोलिसांचा ताफा - घटनास्थळी पोहोचला. तेव्हा तरुणीचा मृत्यू झाला होता. संशयित तरुण गंभीर अवस्थेत होता. दोघांनाही पोलिसांनी मेडिकलमध्ये पाठविले. डॉक्टरांनी तरुणावर तातडीने उपचार सुरू केले. तरुणीच्या मानेवर वार केल्याच्या खुणा होत्या आणि ती मृतावस्थेत होती. तर तरुणाच्या गळ्यावर चाकूचा वार झालेला होता तसेच त्याच्या शरीरावरही चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. विशेष म्हणजे तरुणीचे वडील राजनंद आणि मृतक तरुण हे बल्लारशाह येथे एकत्र नोकरी करत होते. त्यामुळे या तरुणाचे मृतक तरुणीच्या घरी येणे-जाणे होते. त्यानंतर तरुणाची नागपुरात बदली झाली. किरण तरुणीच्या जवळ जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी या संबंधाला विरोध केला होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी या तरुणीचे लग्नही करण्यात आले होते. मात्र वडिलांच्या निधनानंतर या तरुणीला रेल्वेत नोकरी मिळाली आणि त्यानंतर दोघांचे संबंध आणखी घट्ट झाल्याचे सांगितले जाते. घटनेपूर्वी तरुणाने हॉटेलमधील खोली सजवली होती. त्याने गुलाबाची फुले ठेवून 'विल यू मॅरी मी' असा सरप्राइजही आयोजित केला होता. खोलीत नवीन साडीही ठेवण्यात आली होती. त्यामुळे दोघेही लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. मात्र खोलीच्या आत नेमके काय घडले आणि ही घटना रक्तरंजित हत्येत कशी बदलली, याचा तपास सुरू आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या