Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नगर परिषद बल्लारपूर व ऐतिहासिक किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा (Independence Day Celebrated with Enthusiasm at Ballarpur Municipal Council and the Historic Fort)

नगर परिषद बल्लारपूर व ऐतिहासिक किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा (Independence Day Celebrated with Enthusiasm at Ballarpur Municipal Council and the Historic Fort)

बल्लारपूर -: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर परिषद बल्लारपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात माननीय नगराध्यक्षा डॉ. सौ. अलका अनिल वाढई यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. सौ. अलका अनिल वाढई, उपाध्यक्ष श्री. देवेंद्र सत्यदेव आर्य व मुख्याधिकारी श्री. विशाल वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. श्री. अनिल वाढई साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास शहरातील नामवंत नागरिक, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविका, वकील, समाजसेवक तसेच नगर परिषदेचे माजी अधिकारी व कर्मचारी यांची विशेष उपस्थिती लाभली.
               दरम्यान, बल्लारपूर शहराच्या ऐतिहासिक किल्ल्यावरही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री. देवेंद्र सत्यदेव आर्य यांच्या हस्ते ऐतिहासिक किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नगर परिषद कार्यालय तसेच ऐतिहासिक किल्ला परिसरात देशभक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या