रेती उत्खननाचा वाद गेला विकोपाला, चंद्रपुरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी ; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी (Sand mining dispute escalates, violent clash between two groups in Chandrapur; One dead, two seriously injured)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रेती उत्खनन आणि सीमांकनाच्या वादावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली आहे. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून इ तर दोन जखमी झाल्याची माहिती आहे . भारत नागपाल (40) असं मृतकाचं नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आहे. वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या बामुर्डा घाटावरील रविवारी रात्री च्या सुमारास ही घटना घडलीय. त्यामुळे पुन्हा एकदा रेती उत्खनन आणि त्यावरून होणाऱ्या वादाचा मुद्दा चर्चेत आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात असलेल्या वर्धा नदीच्या ढिवरी-पिपर येथील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झाला होता. मात्र या घाटावरून रेती उत्खनन आणि सीमांकना वरून वर्धा जिल्ह्यातीलच दोन गटांमध्ये काल रात्री वाद झाला. कालांतराने हा वाद विकोपाला जाऊन यात मारामारी झाली. दरम्यान यातील एक गट चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत आले आणि या ठिकाणी नागपालचा या हाणामारीत मृत्यू झाला. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलिसांनी अटक केलेल्या 3 लोकांना वरोरा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. तर मृतक नागपाल याचा मृतदेह हिंगणघाट येथे नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या