स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, चंद्रपूरातील जलनगर परिसरात मेफेड्रोनसह ३.५५ लाखांचा मुद्देमालसह आरोपी ताब्यात (Major Operation by the Local Crime Branch: Accused Apprehended in Chandrapur's Jalnagar Area with Mephedrone and Contraband Worth ₹3.55 Lakhs.)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, चंद्रपूरातील जलनगर परिसरात मेफेड्रोनसह ३.५५ लाखांचा मुद्देमालसह आरोपी ताब्यात (Major Operation by the Local Crime Branch: Accused Apprehended in Chandrapur's Jalnagar Area with Mephedrone and Contraband Worth ₹3.55 Lakhs.)

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत ५५.०९ ग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्ज पावडरसह एका आरोपीस ताब्यात घेतले असून सुमारे ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जलनगर वार्ड परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी माधव नारायण मामीड (वर्ष), रा. जलनगर वार्ड, चंद्रपूर यास संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीदरम्यान त्याच्याकडून ५५.०९ ग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्ज पावडर तसेच एक दुचाकी (ज्युपीटर) क्रं. एमएच ३४ बीएन ४८६१ असा एकूण अंदाजे ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
            सदर प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासासाठी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकर, पोहवा सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत, दिपक डोंगरे, इम्रान खान, सचिन गुरनुले, पोअं हिरालाल गुप्ता, शशांक बादमवार, किशोर वाकाटे व अजीत शेंडे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)