Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

रमजान ईद' च्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांचा रूट मार्च (Ballarpur Police's route march on the occasion of Ramadan Eid)

'रमजान ईद' च्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांचा रूट मार्च (Ballarpur Police's route march on the occasion of Ramadan Eid)

बल्लारपूर :- रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बल्लारपूर शहरात पोलिसांचा उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा सुधीर नंदनवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम, तसेच कर्मचारी अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड संतोष येनगंधेवार सह २९ पोलीस कर्मचारी तसेच ८ सैनिक सहभागी झाले होते. 
           सदर रूट मार्च सायंकाळी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून सुरू झाला. गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, श्री टॉकीज, गांधी पुतळा, जामा मस्जिद, आसमा चौक सब्जी मंडी, गांधी चौक या प्रमुख भागांतून मार्गक्रमण करत पुन्हा मुख्य मार्गाने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे समाप्त झाला. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबविला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या