Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

सामाजिक न्यायातून समतेकडे…! चवदार तळे सत्याग्रह, समता शताब्दी वर्ष प्रारंभ सोहळा (From Social Justice to Equality...! Chavadar Tale satyagrah Commencement Ceremony of the Centenary Year of Equality)

सामाजिक न्यायातून समतेकडे…! चवदार तळे सत्याग्रह, समता शताब्दी वर्ष प्रारंभ सोहळा (From Social Justice to Equality...! Chavadar Tale satyagrah Commencement Ceremony of the Centenary Year of Equality)

वृत्तसेवा :- २० मार्च १९२७, हा दिवस ऐतिहासिक होता. प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. “हा संगर केवळ पाण्यासाठी नाही, तर मूलभूत मानवी हक्कांसाठी आहे,” हे त्यांचे याप्रसंगीचे महावाक्य. या वाक्यानेच या लढ्याची प्रेरणा व उद्देशाबद्दल स्पष्ट कल्पना आपल्याला येते. आगामी २० मार्च २०२६ रोजी महाडच्या या ऐतिहासिक क्रांतीला ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. पुढील वर्षी २० मार्च २०२७ रोजी या चवदार तळे सत्याग्रहास शंभर वर्ष पूर्ण होतील. काँग्रेस पक्षाने संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व त्यांचे स्वातंत्र्य-समता-बंधुता ही तत्वे प्रमाण मानूनच आजवर कार्य केले. केंद्रातील असो की राज्यातील सत्ता. ही सत्ता नेहमीच वंचित, शोषित दलितांच्या, आदिवासींच्या, बहुजनांच्या कल्याणासाठी राबविण्यात आली. ज्या ऐतिहासिक घटनेने बाबासाहेबांनी क्रांतीचा पाया रचला त्या क्रांतीकारी घटनेची शताब्दी काँग्रेस पक्षातर्फे साजरी करून बाबासाहेबांना व त्यांच्या क्रांतीला अभिवादन केले जाणार आहे. २० मार्च २०२६ ते २० मार्च २०२७ हे वर्ष काँग्रेस पक्षातर्फे “चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष” म्हणून साजरे केले जाईल. सामाजिक न्यायाशिवाय समता प्रस्थापित होणार नाही आणि समतेशिवाय डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाही प्रत्यक्षात अवतरणार नाही. हे लक्षात घेऊन “सामाजिक न्यायातून समतेकडे” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून हे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या