डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर समितीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन ! (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebration Committee Statement to the Mayor and Chief Officer of Wardha City Committee !)
वर्धा -: वर्धा सिव्हील लाईन परिसर येथील चवदार तळे प्रतिकृतीच्या समोरील ऍक्रेलिक मध्ये संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती बनऊन लावण्यात यावी व सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाला क्रांतिसुर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, असे निवेदन वर्धा नगर पालिकेचे नगराध्यक्ष सुधिर पांगुळ व मुख्याधिकारी विजय देशमुख यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर, सन २०२६ - २७ तर्फे देण्यात आले आहे. महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ पर्यंत भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. असे समितीचे अध्यक्ष राजेश खडसे, महासचिव शारदाताई झामरे, कोषाध्यक्ष उमाताई इंगोले, मुख्य संयोजक विशाल रामटेके, प्रसिद्धी प्रमुख महेंद्र मुनेश्वर, समितीचे उपाध्यक्ष आशिष मेश्राम, प्रशांत भगत, सचिव राजेश फुलमाळी, ताराचंद भगत, अंकुश मुंजेवार, संयोजक - दिनेश थूल, पराग धवन, अमित नाईक, प्रवीण गेडाम, राजिव वानखेडे, सल्लागार - दिनेश तेलंग, आर.एम.पाटील, डॉ.रवीदत्त कांबळे, एड.विजय आगलावे एड.प्रेम ताकसांडे, रवी जगताप, नीरज गुजर, प्रकाश पाटील, अरविंद निकोसे, अजय मेहरा, धम्मपाल शंभरकर, मोहन राईकवार, अतुल दिवे, वसंत भगत, किशोर खैरकर, विशाल मानकर, प्रमोद पाणबुडे, आणि सदस्य एड.नीलिमा ताकसांडे, रंजनाताई ढाले, भावना खडसे, राजू थूल, रमेश निमसडकर, विजय वानखेडे, संजय देशभ्रतार आदींनी कळविले असुन संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पावती द्वारे वर्गणी स्वरूपात सहकार्य करावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर समिती तर्फे प्रसिद्धी पत्रकातुन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या