Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नवभारत विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती निमित्त अभिवादन. (Greetings on the occasion of Sant Gadge Baba's Jayanti at Navbharat Vidyalaya.)

नवभारत विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती निमित्त अभिवादन. (Greetings on the occasion of Sant Gadge Baba's Jayanti at Navbharat Vidyalaya.)


मूल :- शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित नवभारत विद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, एम सी व्हि सी मुल येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विदयालयातील स्काऊट गाईड, राष्ट्रीय हरीत सेना यांनी स्वच्छता अभियान राबवून जयंती साजरी केली हे विशेष. सर्वप्रथम सामुहिक प्रार्थनेनी कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री छत्रपती बारसागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वषाॅ भांडारकर, जेष्ठ शिक्षक श्री गुरुदास चौधरी तसेच सर्व शिक्षक वृंद होते. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री छत्रपती बारसागडे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.माथनकर सरांनी केले.. त्यानंतर जेष्ठ शिक्षक श्री गुरुदास चौधरी यांनी गाडगे महाराज यांच्या कार्याचे विस्तृत असे वर्णन केले. त्यानंतर गाडगे महाराज यांच्या थोर कार्याची माहिती विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.भांडारकर मॅडम ने आपल्या भाषणातून दिली  संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते, असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बारसागडे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षकवृंद, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या