बल्लारपूर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर जि. चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष वार्षिक शिबीर 22 फरवरी ते 28 फरवरी 2026 दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी(दुधोली) गावात आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे " युवकांचा ध्यास - ग्राम शहर विकास, सक्षम युवा, समर्थ भारत या संकल्पनेवर आधारित विशेष श्रम संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय सेवा योजना द्वारे राबविण्यात येणाऱ्या शिबिरा अंतर्गत 22 फरवरीला शिबिरार्थीचे शिबीर स्थळी आगमन होईल 23 फरवरीला दुपारी 12:30 वाजता " राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन समारंभ असून या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून मा. संजयभाऊ कायरकर, तर अध्यक्ष म्हणून डॉ. रजत मंडल, प्रभारी प्राचार्य, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर यांची तर प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रल्हाद बुधाजी आलाम, सरपंच बामणी, सुभाष विठ्ठलराव ताजने, उपसरपंच बामणी, मा. रमेश टेम्भूर्णे, प्रा. शाळा मुख्याध्यापक जि. प. बामणी यांची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून झाली तसेच संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले यानंतर मान्यवर अतिथीचा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करतांना " राष्ट्रीय सेवा योजना ही महात्मा गांधी व पंडित नेहरू यांनी उदात्त हेतूनी तयार केली याद्वारे एक सक्षम युवा व समर्थ भारत घडविण्यावर भर दिला जातो तसेच रासेयो चा मुख्य उद्देश स्वतः बरोबर दुसऱ्याचा विकास घडवून आणणे होय या दरम्यान विदयार्थ्यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत 24 फरवरी ला सकाळी श्रमसंस्कार व ग्राम दिंडी तसेच दुपारी 12:00 ते 2:00 दरम्यान " राष्ट्र उभारणी साठी युवकांचे योगदान " या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे तर 25 फरवरी ला सकाळी श्रम संस्कार व ग्राम दिंडी तसेच दुपारी पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 26 फरवरी ला सकाळी 8:00 वाजता श्रम संस्कार व ग्राम दिंडी तसेच दुपारी 12:00 सामाजिक जनजागृती वर मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 27 फरवरी ला सकाळी 8:00 वाजता श्रमसंस्कार व बौद्धीक स्पर्धा व खेळाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दुपारी 12:00 वाजता आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तर 28 फरवरीला सकाळी 8:00 वाजता श्रमसंस्कार व ग्रामस्वच्छता राबविण्यात येणार असून त्यानंतर दुपारी 12:00 वाजता समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ रजत मंडल प्रभारी प्राचार्य यांची तर प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद आलाम, सरपंच बामणी, सुभाष ताजने, उपसरपंच बामणी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे. या सर्व कार्यक्रमाना उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. पल्लवी जुनघरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ. विनय कवाडे, रासेयो सह कार्यक्रम अधिकारी यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या