लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, चंद्रपूर महापालिकेतील कंत्राटी अभियंत्याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक (Anti-Corruption Department action, Chandrapur Municipal Corporation contract engineer arrested while accepting bribe of Rs 1 lakh 30 thousand)

Vidyanshnewslive
By -
0
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, चंद्रपूर महापालिकेतील कंत्राटी अभियंत्याला ₹१ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक (Anti-Corruption Department action, Chandrapur Municipal Corporation contract engineer arrested while accepting bribe of Rs 1 lakh 30 thousand)

चंद्रपूर :- चंद्रपूरमधील एक धक्कादायक घटना आहे. येथील महानगर पालिकेच्या कंत्राटदाराच्या अभियंत्याच्या लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याला लाच लुचपत प्रतिबंध विभागाने त्याला अटक केली आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार चंद्रपूर महानगरपालिका पालिकातील रमाई शहरी आवास योजनेच्या कंत्राटी अभियंत्याच्या १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या लाचखोर कंत्राटी अभियंत्याचं नाव शुभम वरघाट आहे. कंत्राटदाराकडून काम मंजूर करून, फाईल पुढे सरकण्यासाठी,१ लाख ३० हजार रुपयांची लाच घेतल्याने संबंधित कंत्राटदाराने चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे या अभियंत्याची तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने साफळा रचून अभियंत्याला अटक केली. आता या प्रकरणाची पुढील चौकशी केली जातेय. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)