बल्लारपूर तहसील कार्यालयात २४ फेब्रुवारीला जनता दरबार, जिल्हाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती (Janata Darbar at Ballarpur Tehsil Office on February 24, special presence of District Collector)
बल्लारपूर :- शासनाच्या विविध योजना व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे वेळेत निराकरण करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय, बल्लारपूर येथे २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार दुपारी १२.३० ते १.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रमास विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते उपस्थित नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या तक्रारी व समस्या जाणून घेणार आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यां संदर्भातील आवश्यक कागदपत्रे व माहिती सोबत घेऊन जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार रेणुका कोकाटे बल्लारपूर यांनी केले आहे. तसेच बल्लारपूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनीही आवश्यक माहितीसह जनता दरबारास अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या