मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर-२ बीट परिसरात वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय इसमाचा मृत्यू (60-year-old Isma died in a tiger attack in Padmapur-2 Beat area of Moharli forest area.)
मोहर्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या तत्परतेने मृतकाच्या नातेवाईकांना मदत
चंद्रपूर :- मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर-२ बीट परिसरात वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ शिवराम लोनबले (वय ६०), रा. वरवट हे मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७९ मधील नाल्यालगत जळाऊ लाकूड आणण्यासाठी गेले होते. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मोहर्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या सहकार्याने पोलीस उपनिरीक्षक उरकुडे व त्यांच्या पथकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पंचनामा व मौका पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला. मृताच्या नातेवाईकांना तात्काळ मदत म्हणून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून वाघाच्या हालचालींवर वन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या