बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियानासाठी बल्लारपूरात रॅली व सभा (A rally and meeting were held in Ballarpur for the awareness campaign of the Mahabodhi Mahavihara liberation movement in Bodh Gaya.)

Vidyanshnewslive
By -
0
बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियानासाठी बल्लारपूरात रॅली व सभा (A rally and meeting were held in Ballarpur for the awareness campaign of the Mahabodhi Mahavihara liberation movement in Bodh Gaya.)

भन्ते विनाचार्य व भिक्खु संघ हे प्रमुख मार्गदर्शक

बल्लारपूर :- महाबोधी महाविहार, बुद्ध गया मुक्ती आंदोलनाच्या जनजागृतीसाठी बल्लारपूर शहरात भव्य रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनजागृती रॅलीची सुरुवात १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी दुपारी १.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून होणार असून ही मिरवणूक पाली बुद्धविहार येथे समारोपास पोहोचणार आहे. यानंतर दुपारी ३.०० वाजता जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये "गहरा और असरदार है, धम्म का किरदार, क्रांति की ज्वाला को, क्या रोकेगी दीवार" या प्रेरणादायी विचारांचा संदेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी भन्ते विनाचार्य व भिक्खु संघ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना धम्म, समता व सामाजिक न्यायाच्या विचारांनी मार्गदर्शन करणार आहेत. सदर जनजागृती अभियानाचे आयोजन समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच बल्लारपूर नगरातील समस्त बौद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून बोधगयेतील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)