Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक..! चंद्रपूरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेसच्या जेवणात अळ्या झुरळ व उंदीराची विष्ठा...? (Shocking...! Maggots, a cockroach, and rat droppings found in the mess food at an engineering college in Chandrapur...?)

धक्कादायक..! चंद्रपूरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेसच्या जेवणात अळ्या झुरळ व उंदीराची विष्ठा...? (Shocking...! Maggots, a cockroach, and rat droppings found in the mess food at an engineering college in Chandrapur...?)

चंद्रपूर :- चंद्रपूर येथील प्रतिष्ठित अशा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेस मधील जेवणात झुरळ, अळ्या आणि उंदरांची विष्ठा आढळल्याचा गंभीर आरोप करत येथील संतप्त विद्यार्थ्यांनी आज २१ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या पायरीवर एक दिवसीय ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या अशा तीव्र आंदोलना नंतर अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक अन्न सुरक्षा अधिकारी सतर्क झाले आहेत. मेसच्या स्वयंपाक घरातील स्वच्छतेची तपासणी करून, तिथे वापरले जाणारे तेल, धान्य आणि शिजवलेल्या अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कँटीन किंवा मेसच्या ठिकाणी गंभीर अस्वच्छता किंवा अन्नाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधित कंत्राटदाराचा परवाना तात्काळ रद्द किंवा निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आंदोलनादरम्यान कॉलेज प्रशासनाकडून “जेवणात कीटक किंवा किडा आढळणे ही सामान्य बाब आहे” असे बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या संवेदनशील विधानामुळे विद्यार्थ्यांमधील आणि पालकांमधील संताप आणखीच वाढला असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे यासंदर्भात विद्यार्थ्याकडून पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर अनेक मागण्या ठेवल्या आहेत १)कंत्राटदाराची तात्काळ हकालपट्टी, २)सध्याच्या मेस कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि नवीन, दर्जेदार कंत्राटदाराची नियुक्ती केली जावी, ३)कडक स्वच्छता नियमावली बनवून वसतिगृहाच्या स्वयंपाकघराची दररोजची स्वच्छता आणि तिथे जंतुनाशक फवारणी केली जावी, जेणेकरून झुरळ किंवा उंदरांचा प्रादुर्भाव होणार नाही, ४)जेवणाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र समिती स्थापन करावी, जी दर आठवड्याला जेवणाची तपासणी करेल. इत्यादी मागण्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला केल्या आहेत. दरम्यान सविस्तर वृत्त येई पर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या