वर्धा :- लोकनेते दिवंगत दत्ता मेघे यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक परिश्रमांतून वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, (अभिमत विद्यापीठ) या नामांकित शैक्षणिक व वैद्यकीय साम्राज्याची स्थापना करण्यात आली होती. विदर्भातील तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था म्हणून या विद्यापीठाने नावलौकिक मिळवला आहे. मात्र, अलीकडच्या काळात या संस्थेच्या कारभाराच्या चाव्या अदानी समूहाकडे गेल्याने आता 'दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था' या ऐतिहासिक नावात बदल करून आता 'अदानी उच्च शिक्षण व संशोधन संस्था' असे नवे नामकरण करण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत केली जाणार असल्याची माहिती आहे. या अधिकृत घोषणेपूर्वीच विद्यापीठाच्या अंतर्गत प्रशासकीय वर्तुळात सर्व अंतर्गत कामकाज, कागदपत्रे आणि डिजिटल दळणवळण अंतर्गत गोटातून मिळाली आहे. गेल्या या नव्या नावाने सुरू झाल्याची माहिती काही काळापासून अदानी समूहाची सामाजिक शाखा असलेल्या अदानी फाउंडेशन आणि मेघे समूह यांच्यात मोठ्या कराराच्या वाटाघाटी सुरू होत्या.
आरोग्य आणि प्रगत शिक्षण क्षेत्रांत जागतिक दर्जाचे उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी दोन्ही समूहांमध्ये सामंजस्य करार झाला होता. मात्र, सुरुवातीला केवळ सामाजिक भागीदारी किंवा तांत्रिक सहकार्य असल्याचे भासवले गेले असले, तरी आता थेट संस्थेचे नावच बदलण्यात आल्याने हे संपूर्ण शैक्षणिक 'साम्राज्य' अदानी समूहाच्या थेट नियंत्रणाखाली गेल्याचे स्पष्ट होत आहे. रुग्णांचा आधार रुग्णालय ठरले विदर्भातील सावंगी (मेघे) येथील हे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जनतेसाठी हक्काचा आधार मानले वर्ध्यासह संपूर्ण विदर्भातील गोरगरीब जाते. लोकनेते दत्ता मेघे यांनी लावलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील बलाढ्य अशा या वृक्षाचे नाव बदलून आता तिथे अदानी समूहाचे नाव जोडले गेल्याने शैक्षणिक व राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. उद्या होणाऱ्या अधिकृत पत्रकार परिषदेत या नामकरणाबद्दलची माहिती पुढील वाटचाल काय असेल, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या