Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर शहरात प्रसूती दरम्यान रुग्णालयात माता आणि नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू (Tragic death of a mother and newborn baby during delivery at a hospital in Ballarpur city.)

बल्लारपूर शहरात प्रसूती दरम्यान रुग्णालयात माता आणि नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू (Tragic death of a mother and newborn baby during delivery at a hospital in Ballarpur city.)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात प्रसूती दरम्यान माता आणि नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरात अनेक तर्क वितर्क लावल्या जात असून, हलगर्जी पणामुळे आपल्या पत्नी आणि नवजात बालकाचा जीव गेल्याचा आरोप मृतक महिलेच्या पतीने केला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेत डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे आपली पत्नी आणि नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची तक्रार बल्लारपूर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त होत आहे. बल्लारशाह ते बडनेरा दरम्यान  लोको पायलट म्हणून रेल्वेत सेवा देणारे रणजीत कुमार सिंग यांनी पत्नीला रुग्णालयात दाखल केले तेव्हा पत्नी अगदी ठणठणीत होती. डॉक्टरांनी सर्व तपासण्या करूनच प्रसूती केली. पण प्रसूती दरम्यान डॉक्टरांनी आवश्यक बाबी न हाताळता हलगर्जी केल्या मुळेच पत्नी आणि बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. प्रसूती झाल्यावर नवजात बालकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत डॉक्टर फक्त नवजात बालकाची प्रकृती बघत होते. मात्र प्रसूत झालेल्या माझ्या पत्नी जवळ ४० मिनिटे कोणीही नव्हते, प्रसूती नंतर तिला योग्य तो उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत “पत्नीची प्रकृती खूप गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी आपल्याला का सांगितले नाही ?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे आपल्याला पत्नी आणि नवजात बालकाला गमवावे लागल्याची रीतसर तक्रार पोलिसात दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. 
        या संदर्भात अधिक माहिती नुसार बल्लारपूर शहरातील महिलांच्या प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेले गणपती वॉर्ड परिसरातील येथे एका मोठ रुग्णालय आहे. दरम्यान या रुग्णालयात नीलमकुमारी रणजीत कुमार सिंग रा.पटना, बिहार यांना २२ सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. पहाटे ३ च्या सुमारास त्यांना प्रसुती वेदना सुरू झाल्यावर डॉक्टरांनी प्रसुतीची प्रक्रिया पूर्ण केली. पहाटे ५ च्या सुमारास प्रसूती झाली. पण उपचारा दरम्यान नवजात बाळ काही वेळाने दगावले. आणि प्रसूत मातेचाही दुदैवी मृत्यू झाला. घटनेनंतर मृतक माता आणि मृतक नवजात बालकाचे शव बल्लारपूर पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे. शवविच्छेदना नंतर बिहार येथील पटना येथे दोन्ही दुर्देवी माता आणि नवजात बालकाचा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संबंधाने सदर प्रतिनिधीने  संबंधित रुग्णालयास भेट देऊन अधिकची माहिती घेतली असता तेथील उपस्थित महिला वैद्यकीय अधिकारी यांनी घटनाक्रम सांगितला. प्रसूती मातेची बीपी अधिक लो झाल्याने तथा नवजात बाळा भोवती नाळेचा फास आवळला गेल्याने आम्ही प्रयत्न करूनही दोघांना वाचवू शकलो नाही, विशेष म्हणजे यावेळी चंद्रपुरातून दोन तज्ञ डॉक्टरांना बोलावले, आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. पण आम्हाला त्यांचा जीव वाचवता आला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या