चंद्रपूर पोलीस दलात फेरबदल, 23 पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या निशिकांत रामटेके जिल्हा विशेष शाखेत, तर लता वाढीवे सिंदेवाही पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती (Reshuffle in the Chandrapur Police Force: 23 police officers transferred; Nishikant Ramteke assigned to the District Special Branch, while Lata Wadhiwe appointed as Police Inspector at Sindewahi.)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा पोलिस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सोमवारी २८ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले. विनंतीवरून तसेच प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्येही बदल झाला आहे. विनंतीवरून करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले यांची नियंत्रण कक्ष, चंद्रपूर येथून कोरपना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांची कोरपना येथून सिंदेवाही येथे, तर पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांची चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांची ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातून गडचांदूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांची गोंडपिंपरी येथून मुल पोलीस ठाण्यात, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे यांची नागभीड येथून भिसी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली झाली आहे.
पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांची सिंदेवाही येथून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांची जिल्हा विशेष शाखेतून आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांची नियंत्रण कक्षातून सायबर पोलीस ठाण्यात, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहीफळे यांची नियंत्रण कक्षातून वरोरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लभाने यांची रामनगर पोलीस ठाण्यातून उपपोलीस ठाणे लाठी येथे बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सहारे, मनोज खडसे, रमेश नन्नावरे व अनिल राऊत तसेच पोलीस उपनिरीक्षक रविंद्र इंगळे, भारत थिटे आणि अशोक मरस्कोल्हे यांच्या विनंती बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांची वरोरा पोलीस ठाण्यातून रामनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदार यांची भद्रावती येथून उपपोलीस ठाणे धाबा येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव यांची शेंगाव येथून भद्रावती पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांची कोठारी पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार यांची स्थानिक गुन्हे शाखेतून कोठारी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या