Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रग्रह’ झालेल्या रस्त्यांवर टोलवसुली कशासाठी? विकासाचे ढोल वाजवणाऱ्या नेत्यांना जनतेचा त्रास दिसत नाही का? - रवि पुप्पलवार यांचा संतप्त सवाल (Why collect toll on roads that have become 'lunar'? Don't the leaders who are beating the drums of development see the suffering of the people? - Ravi Puppalwar's angry question)

चंद्रग्रह’ झालेल्या रस्त्यांवर टोलवसुली कशासाठी? विकासाचे ढोल वाजवणाऱ्या नेत्यांना जनतेचा त्रास दिसत नाही का? - रवि पुप्पलवार यांचा संतप्त सवाल (Why collect toll on roads that have become 'lunar'? Don't the leaders who are beating the drums of development see the suffering of the people? - Ravi Puppalwar's angry question)

बल्लारपूर :- बल्लारपूर-चंद्रपूर ते वरोरा महामार्गाची अवस्था चंद्रग्रहावरील खाचांसारखी झाली असतानाही, या रस्त्यावर अव्याहतपणे टोलवसुली सुरू असल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी, बल्लारपूर शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अधिकारी ते आमदारांपासून खासदारांपर्यंत सर्वांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रवि पुप्पलवार यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे. विकासाचे पोकळ ढोल वाजवणाऱ्या नेत्यांना मते मिळवतानाच जनतेची आठवण येते का, असा थेट सवालही त्यांनी विचारला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बल्लारपूर-चंद्रपूर-वरोरा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यावर गिट्टी पसरल्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावर भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक आमदार, खासदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची असेल, असा स्पष्ट इशाराही पुप्पलवार यांनी दिला आहे. या गंभीर प्रश्नासंदर्भात रवि पुप्पलवार यांनी संबंधित विभागाचे अभियंता तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘विश्वराज कन्स्ट्रक्शन’ कंपनीला अनेकदा नोटीस देऊनही ठेकेदार रस्त्याची दुरुस्ती करत नसल्याचे सांगितले. "विश्वराज कन्स्ट्रक्शन कंपनीला २०४१ पर्यंत विसापूर आणि वरोरा येथे टोलवसुली करण्याची परवानगी आहे. महामार्गाची दुरुस्ती, स्वच्छता आणि देखभाल करणे ही त्यांची जबाबदारी आहे. असे असतानाही, ठेकेदार आपले कर्तव्य पार पाडत नाही आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. याचा अर्थ सामान्य नागरिकांनी काय समजावे?" स्थानिक नेते आणि अधिकारी या प्रश्नावर गप्प असल्याने, ठेकेदार, नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचा आणि त्यांना यातून 'कट' मिळत असल्याचा गंभीर आरोपही पुप्पलवार यांनी केला आहे. जर आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे नसेल, तर त्यांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत टोलवसुली थांबवून दाखवावी, असे थेट आव्हान पुप्पलवार यांनी दिले आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या