Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

गणपती विसर्जन होत असतांना चंद्रपूर शहर पोलिसांची धडक कारवाई, रामाळा तलाव परिसरात धारदार चाकूसह तरुण ताब्यात (Chandrapur city police take action while Ganpati idol is being immersed, youth arrested with sharp knife in Ramala Lake area)

गणपती विसर्जन होत असतांना चंद्रपूर शहर पोलिसांची धडक कारवाई, रामाळा तलाव परिसरात धारदार चाकूसह तरुण ताब्यात (Chandrapur city police take action while Ganpati idol is being immersed, youth arrested with sharp knife in Ramala Lake area)

चंद्रपूर :- गणपती विसर्जन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर पोलिसांनी आर्म्स अॅक्टअंतर्गत मोठी कारवाई केली. पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या आदेशानुसार डी.बी. पथक व पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना ५ सप्टेंबर रोजी रामाळा तलावाजवळ एका इसमाकडे धारदार हत्यार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करून पांढऱ्या रंगाच्या HYUNDAI i20 Magna क्रं MH 34 AA 6291 कारमधून साहिल विश्वजितकुमार सिंग (२९), रा. लालपेठ कॉलरी नं.३, चंद्रपूर याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून एका बाजूने धार असलेला व टोकदार अशा प्रकारचा १६ इंची स्टील चाकू मिळून आला. सदर शस्त्र व चारचाकी वाहन मिळून एकूण ५ लाख १०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 
         या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं ६४९/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये नोंदविण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, मपोहवा. भावना रामटेके, पोहवा सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, नापोशि कपुरचंद खरवार, पोअं योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, महिला पोलीस सारीका गौरकार, दीपिका झिंगरे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या