बल्लारपूर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपस्थितीत पार पडला तक्रार निवारण दिन (A Grievance Redressal Day was held at Ballarpur Police Station in the presence of Superintendent of Police Mummaka Sudarshan)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपस्थितीत पार पडला तक्रार निवारण दिन (A Grievance Redressal Day was held at Ballarpur Police Station in the presence of Superintendent of Police Mummaka Sudarshan)


बल्लारपूर :- काल २८ जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बल्लारपुर पोलीस स्टेशन येथे मुख्यमंत्री यांचे राज्याच्या सर्वागीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानी १०० दिवसाचा आराखडा तयार करुन ठोस कामगिरी करण्याचे निर्देश दिल्याप्रमाणे जनतेच्या तरी ऐकून त्या निवारण करण्याकरिता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपस्थितीत बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिन पार पडला. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी रस्ता सुरक्षा, नविन कायदे यातील बदल, महिला च बालकाविरुद्ध सुरक्षा तसेच गुन्हयाबाबत, सायबर जागृती बाबत माहिती देवुन मार्गदर्शन केले. तसेच पोलीस ठाणे परिसर स्वच्छ ठेवणे बाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या. सदर शांतता कमिटी बैठकी करिता पोलीस ठाणे बल्लारपूर येथील सर्व शांतता कमिटी सदस्य हजर होते. पोलीस अधिक्षक यांनी पोलीस पाटील यांची ही बैठक घेवुन त्यांना मार्गदर्शन केले. 

 
         पोलीस तक्रार निवारण दिनाच्या निमीत्याने पोलीस ठाणे बल्लारपूर येथे एकूण ८ वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रार अर्जदार आले असता त्यांचे म्हणणे ऐकूण पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः तक्रारदार यांचे तक्रारीचे निवारण केले. सर्व तक्रारदार यांनी तक्रारीचे निवारण झाल्याबाचत समाधान व्यक्त केले व जिल्हयाचे पोलीस प्रमुख हे आमच्या अडचणी बाबत जातीने लक्ष देत आहेत व स्वतः तक्रार निवारण साठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे आम्हाला समाधान वाटत आहे असा प्रतिक्रिया तक्रारदार यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दीपक साखरे, बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)