Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

डॉ. बादलशाहा चव्हाण यांच्या ग्रंथ 'सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष' राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर (Dr. Badalshah Chavan's book 'Social Existence Struggle' state level award announced)

डॉ. बादलशाहा चव्हाण यांच्या ग्रंथ  'सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष' राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर (Dr. Badalshah Chavan's book 'Social Existence Struggle' state level award announced)


बल्लारपूर :- स्थानिक महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बादलशाहा डोमाजी चव्हाण यांच्या 'सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष' या संपादित ग्रंथाला चंद्रपूर येथील शब्दांगण बहुुउद्देशिय ज्ञानप्रबोधिनी या संस्थेचा राज्यस्तरीय 'शब्दांगण साहित्य पुरस्कार 2023' जाहीर झाला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले. शब्दांगण बहुुउद्देशिय ज्ञानप्रबोधिनी संस्था, चंद्रपूरच्या वतीने राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार 2023 चे आयोजन करण्यात आले होते.


         या पुरस्कारासाठी राज्यभरातून साहित्य मागविण्यात आले होते. परीक्षकांनी डॉ. बादलशाहा चव्हाण यांच्या 'सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष' ह्या संपादित ग्रंथाची निवड केलेली आहे. शब्दांगण साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल समीक्षक डॉ. सुशीला ढगे, नागपूर, महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. संजयभाऊ कायरकर, उपाध्यक्ष श्री. राजेशजीं चिताडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या