चंद्रपूर :- चिमूर तहसीलच्या संघारामगिरी येथे आयोजित बौद्ध धम्म संमेलनांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या महापरित्राण पाठात आझाद समाज पक्षाचे (भारत एकता मिशन) राष्ट्रीय अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद उपस्थित राहणार आहेत. बौद्ध धम्माच्या अनुयायांसाठी दरवर्षी 30 आणि 31 जानेवारी रोजी पूज्य भदंत ज्ञानज्योती यांच्या मार्गदर्शनाखाली संघराम गिरी (रामदेगी) येथे धम्म संमेलन आयोजित केले जाते. या धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पूज्य भदंत शिलानंद महास्थवीर आंबोडा जि. वर्धा उपस्थित राहणार आहे यामध्ये हजारो भाविक सहभागी होऊन धम्मदेसनाचा लाभ घेतात. या काळात महापरित्राण पाठाचेही आयोजन केले जाते.
या परिषदेला संबोधित करण्यासाठी आझाद समाज पक्षाचे (भारत एकता मिशन) राष्ट्रीय अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद यांची नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आझाद समाज पक्षाने अमित भीमटे यांच्या रूपाने आपला उमेदवार उभा केला होता. त्यांना मतदानात चौथा क्रमांक मिळाला होता या निमित्ताने आझाद चिमूर येथील मतदारांचे कृतज्ञता व धम्मदेसना स्वीकारून तथागत बुद्धांना नमन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी चिमूर शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. चिमूर शहरातील हजारे पेट्रोल पंप चौकात आयोजित स्वागत कार्यक्रमात पक्षाचे कार्यकर्ते व आंबेडकरी मिशनरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आझाद समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अमित भीमटे यांनी दिली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मनीष साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या