चंद्रपूर :- प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही विशेष सेवा पुरस्कार वृतपत्राच्या जिल्हा प्रतिनिधी यांना तसेच दृतीय पुरस्कार श्रीमती नीलिमा मंडपे यांना विशेष सेवा पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिन रोजी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा परिसरात इंदिरा गांधी विशेष सेवा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सर्व प्रथम राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवराचा हस्ते पुष्पमाला अर्पण करून इंदिरा गांधी स्कूल चे बँड पथका सह माणवंदना देण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष माजी खासदार नरेशबाबू पुगलिया व प्रमुख अतिथी माजी केबिनेट मंत्री व जिल्हाचे माजी पालकमंत्री मा, सुधीरभाऊ मुनगंटीवार युवा नेते राहुल पुगलिया, कु, प्रियंका पुगलिया जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रीमती नीलिमा मंडपे, ऍड, अविनाश ठावरी, भूपेंद्र प्रसाद, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले आणि वृतपत्राचे जिल्हा प्रतिनिधी मुन्ना खेडकर, महेंद्र ठेमस्कर, संजय रामगिरवार, रवींद्र जुनारकर, मजहर अली, अरुण सहाय, पंकज मोहरीर, प्रमोद उंदीरवाडे, योगेश चिदालोरे, मंचवार उपस्थित होते. प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मुर्ती प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने प्रतिष्ठान चे अध्यक्ष नरेशबाबू पुगलिया यांचा पुढाकाराने प्रियदर्शनी इंदिरा गांधी विशेष सेवा २०२५चा प्रथम पुरस्कार वृतपत्रामधून उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या व चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेली इरई व झरपट नदीच्या संवर्धन व संरक्षनाकरिता तसेच इतर विकासात्मक प्रकल्प जनतेमध्ये जनजागृती केल्याबद्दल वृतपत्राचा जिल्हा प्रतिनिधीना माजी मंत्री व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा हस्ते पुरस्कार नगद राशीं १, ११, १११ रुपये, सम्मान चिन्ह सम्मान पत्र, शाल पुष्पगुछ देऊन गौरविण्यात आले. तसेच कर्तव्यनिष्ठ अधिकारी निर्भीडपने व भ्रष्टाचारला आळा घालण्या साठी धाडसी निर्णय घेतल्या बद्दल या कार्याची दखल घेऊन प्रियदर्शनी इंदिरा गांधी विशेष सेवा दृतीय पुरस्कार पुरस्कार श्रीमती नीलिमा मंडपे जलसंधारण अधिकारी यांना नगद राशीं ५१, १११ रुपये सम्मान चिन्ह सम्मान पत्र पुष्पगुछ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम चे अध्यक्ष नरेशबाबू पुगलिया म्हणाले की चंद्रपूर महानगराची पंचक्रोशीची जीवनवाहिनी इराई व झरपट नद्या प्रदूषित झाल्याची चिंता व्यक्त केली असून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेत चंद्रपूर शहरातील इराई व झरपट नदीचे संवर्धन भिंत उभारणे, खोलीकरण व सोंदरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देने गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शनात म्हटले की जे सामाजिक दायित्व समजून काम करतात त्यांचा पाठीशी समाज उभा राहिला पाहिजे. या शुद्ध हेतू घेऊन अनेक वर्षा पासून नरेशबाबू त्यांचा संस्थेचा माध्यमातून समाजउपयोगी काम करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला पुरस्काराने सम्मानित करतात व त्याचा पाठीशी नेहमी असतात. वृतपत्रा मधून उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या व जनतेमध्ये जनजागृती केल्या बद्दल वृतपत्राचा जिल्हा प्रतिनिधीना प्रथम पुरस्कार देऊन सम्मानित केले याचे अभिनंदन करतो. यांचा कार्याची दखल घेऊन आज यांना आपण सत्कार करतो. या पुरस्कार सोहळाचे प्रास्ताविक व संचालन ऍड, अविनाश ठावरी यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेंद्र बेले यांनी केले. या प्रसंगी सर्व पदाधिकारी, कामगार नेते, शिक्षक, शिक्षिका शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या