Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक..! बल्लारपूरात शांतीनगर परिसरात युवकांवर शस्त्राने जीवघेणा हल्ला युवक गंभीर, नागपुरात उपचार सुरु (Shocking! Youths attacked with a weapon in the Shantinagar area of ​​Ballarpur; one youth critically injured, undergoing treatment in Nagpur.)

बल्लारपूर :- शहरातील शांतिनगर परिसरात आज दुपारी एका २० वर्षीय युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली. रोशन रंजन भोंड २० वर्षे रा. शांतिनगर, ग्रामीण रुग्णालयामागे, बल्लारपूर याच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले ही घटना आज दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तेथूनही त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. 
         प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन जणांनी युवकावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून हल्ल्याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या