स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चंद्रपूरात अष्टभुजा वॉर्ड परिसरात एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा, दोन महिलाना अटक (Local Crime Branch action: Raid on a brothel operating in a house in the Ashtabhuja Ward area of Chandrapur; two women arrested.)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसरात राहत्या घरातून कथित वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी अष्टभुजा वॉर्डातील लव्ह इंडिया चर्चच्या मागील परिसरातील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर विशेष पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून कारवाईची आखणी केली. घटनास्थळावरून मोबाईल, रोख रक्कम आणि कंडोमचा बॉक्स असा एकूण २२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महिला पंच, सोशल वर्कर तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान मुस्कान शफीक शेख (४०) आणि रेशमा ऊर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (४५) या दोघी संगनमत करून महिलांकडून कथित वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. तसेच दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या