चंद्रपुरात पुन्हा एका तरुणाची हत्या : जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग 4 हत्या ! अवघ्या 8 तासात पोलिसांनी 2 आरोपीना अटक केल्याची माहिती. (Another youth was killed in Chandrapur: 4 consecutive murders in the district last week! Information that the police arrested 2 accused in just 8 hours.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपुरात पुन्हा एका तरुणाची हत्या : जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग 4 हत्या ! अवघ्या 8 तासात पोलिसांनी 2 आरोपीना अटक केल्याची माहिती. (Another youth was killed in Chandrapur: 4 consecutive murders in the district last week!  Information that the police arrested 2 accused in just 8 hours.)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मागील आठवडाभरात जिल्हा 4 हत्याकांडानी गाजला या घटनेत 4 नागरिकांचा जीव गेला तर 2 गंभीर जखमी असल्याची  माहिती आहे बल्लारपूर व चिमुर मध्ये 2 तर चंद्रपुरात 2 अशी 4 नागरिकांची हत्या झाली आजच्या घटनेत पडोली पोलीस स्टेशन हद्दीतील छोटा नागपूर रोडवरील झुडपात अज्ञात इसमाचा मृतदेह राखळ टाकून झाकलेल्या अवस्थेत आढळून आला असता स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 8 तासात मृतकाची ओळख पटवून दोन आरोपींना अटक केली आहे. आज दि. 18 जून 2023 रोजी छोटा नागपुर रोड, पाईप लाईन जवळ, पटेल विटाभटटीच्या मागील बाजूस पाईपलाईनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला झुडपामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पडुन असल्याची व त्या मृतदेहावर राखळ टाकुन असल्याची माहिती पोलीस स्टेशन पडोली ला प्राप्त झाली त्यावरून पडोली पोलीस स्टेशन येथे कलम 302 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी सदर गुन्हयाचा छळा लावण्याकरीता वेगवेगळे पथक तयार करून गुन्हा उघड करण्याबाबत मार्गदर्शक सुचना देवुन घटनास्थळावर रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पथक घटनास्थळावर पोहचुन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाला सुरूवात करून गोपनीय माहिती काढुन अनोळखी मयत ईसमाची ओळख पटविली असता मयत इसम हा विशाल उर्फ विश्वास अमर पाटील, घुटकाळा वार्ड, चंद्रपुर येथील असल्याचे निष्पन्न झाले. 

         सदर युवकाची हत्या प्रेमप्रकरणाच्या वादातून झाले असल्याची आणि मृतक आणि दोघे मारेकरी आरोपी ही अल्पवयीन असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपुर्ण तपास करून नमुद गुन्हयातील दोन आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, मृतक व दोन आरोपी हे शुक्रवारचे रात्री अंदाजे 08:00 ते 8:30 चे दरम्यान पडोली येथे गेले असता, सदर ठिकाणी त्यांचेमध्ये वाद निर्माण होवुन भांडण झाल्याने आरोपीने मृतकाला मारहान करून खुन केला व मृतकाच्या शरीरावर जवळ असलेली राखळ टाकुन निघुन गेल्याची कबुली दिली. सदर कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंदपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलीस निरीक्षक मडावी, पोउपनी विनोद भुरले, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, गजानन नागरे, पो.शि. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, नरेश डाहुले यांनी केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)