धक्कादायक ! चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातून 4 दिवसाच्या नवजात बाळाची चोरी, मात्र पोलिसांच्या तत्परतेने 3 तासात बाळ मातेच्या स्वाधीन (Shocking! A 4-day-old newborn baby was stolen from Chandrapur District General Hospital, but the baby was handed over to the mother within 3 hours by the police.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर येथील गोर-गरीब जनतेच्या सेवेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय ओळखलं जात या रुग्णालयात गडचिरोली, तेलंगाना राज्य इतकंच नव्हे तर लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातून ही रुग्ण आरोग्यसेवेसाठी येतात मात्र आज 20 जून रोजी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आज सकाळी 8:00 वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातून 4 दिवसाच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना घडली या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी सीसीटीव्ही व ईतर यंत्रणांच्या माध्यमातून अवघ्या 3 तासातच चोरी गेलेल्या बालकाचा शोध लावला व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून आरोपी महिलेला बाळासह अटक केली व बाळाला मातेच्या स्वाधीन केले. 

         चंद्रपूर शहर पोलिसांना या घटनेचं वृत्त कळताच चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि महेश भोंगले आपल्या चमू सह रुग्णालयात दाखल झाले त्यांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही व ईतर यंत्रणा तपासून संशयाच्या आधारावरून आरोपीच्या मागावर पाठविले व अवघ्या 3 तासात हिंगणघाट येथून एका महिलेसह बालकास अटक केली सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी महिला ही मागील 3 ते 4 दिवसापासून रुग्णालय परिसरात वावरत होती व फिर्यादी महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होती. व आज संधी साधून त्या महिलेने सकाळच्या सुमारास बाळाला चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या तत्परतेने सदर प्रकरणाचा उलगडा झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)