Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपुरातील पवित्र अशा ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे अभ्यासिकेसाठी 1 करोड रुपयाचा निधी मंजूर आ.किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाला यश

चंद्रपुरातील पवित्र अशा ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे अभ्यासिकेसाठी 1 करोड रुपयाचा निधी मंजूर 

आ.किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाला यश 

चंद्रपूर :- 16 ओक्टोम्बर 1956 ला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक  दिक्षाभुमी येथे अभ्यासीकेसाठी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी एक करोड रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतुन येथे सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासीका तयार केल्या जाणार आहे. सदर निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहे. यावेळी मेमोरिअल सोसायटीचे सहसचिव कुणाल घोटेकर,  प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, उपप्राचार्य डॉ. संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के,  प्रा. दिलीप रामटेके आदिंची उपस्थिती होती. चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभुमीचा सर्वसमावेशक विकास व्हावा या करिता आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. सदर दिक्षाभुमीचा विकास व्हावा या करिता पहिल्याच अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी एकत्रीत 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर या मागणीकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

        दरम्यान डाॅ. बाबासाहेबांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या दिक्षाभुमी येथे सुसज्ज अभ्यासिका तयार करण्याचे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले होते. आता या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली असून सदर अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. डाॅ. बाबा साहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सदर निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पवित्र दिक्षाभुमी येथे लवकरच अभ्यासिका साकारण्यात येणार आहे. सदर निधीतुन या अभ्यासिकेत पुस्तके, संगणक व इतर महत्वाच्या साधन सामग्री उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. दरम्यान अभ्यासिकेला 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिल्या बद्दल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी कार्यालयात त्यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले. दिक्षाभुमीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असुन आजवर दुर्लक्षित राहिलेल्या दिक्षाभुसाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने माझा पाठपुरावा सुरु असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या