बल्लारपूर -: जंगलाचा राजा कोण, याची प्रचिती पुन्हा एकदा कारवा बफर सफारीत आली. जंगलाची राणी ओळखल्या म्हणून जाणता माणसाला वाघीण 'राणी दरारा असा की', तिला रुग्णाची मागणी बिबट्याने झाडावर धूम ठोकली. केवळ स्वत: घडलेल्या या थरारक प्रसंगाने जिप्सीतील अक्षरशः अवाक झाले. वाघी खाली आणि बिबट झाडावर, असा अनोखा नजारा वाहक आपल्या मोबाईल आणि कॅमे-यात कैद केला. 15 नोव्हेम्बर रोजी सकाळ धुक्यात कारवा जंगलात सफारीसाठी जिप्स्या दाखल झाल्या होत्या. जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असताना अचानक झुडपातून वाघिणीची डरकाळी ऐकू आली. काही क्षणातच 'राणी' आपल्या बछड्यासह रस्त्यावर अवतरली. तिचा रुबाबदार वावर आणि दिमाखदार चाल पाहून पर्यटकांच्या जिप्स्या जागेवरच चालल्या. चकचकीत रस्त्यालगतच्या झाडाखाली बसलेल्या बिबट्याची नजर राणीवर पडली. वाघीण जवळ येत असल्याचे लक्षात येते. काही क्षणांतच तो उंच फांदीवर बसला. खाली राणी हालचाल आणि झाडावर दाबून धरून बसलेला बिबट, हे दृश्य पाहुण पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. कोणी मोबाईलमध्ये व्हिडिओ टिपत होते, तर कोणी कॅमेऱ्यात हा दुर्मिळ क्षण साठवत होते.
जंगलातील नैसर्गिक या घडामोडीने कारवा सफारीतील सकाळ अविस्मरणीय ठरली. पर्यटकांनी व्हिडिओच्या नादात वन्यप्राण्यांच्या अधिवासात अडथळे निर्माण करू नयेत, असे आवाहन बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांनी केले आहे. कारवा सफारी हाऊसफुल्ल ! दिवाळीच्या सुट्यामुळे कारवा सफारीला पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात दीड हजारांहून अधिक पर्यटकांनी सफारीचा आनंद लुटला आहे. अशातच राणी आणि बिबट्याचा या थरारक प्रसंगामुळे कारवा जंगल सफारीचे आकर्षण निश्चितच वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कारवा जंगलात वन्यजीवांची संख्या कारवा जंगलात ११ वाघ आणि ८ बिबटयासह बायसन, सांबर, जंगली कुत्रे, अस्वल आणि मोर अशा विविध वन्यजीवांचा अधिवास आहेत. त्यामुळे सफारी दरम्यान पर्यटकांना विविध वन्यप्राण्याचे दर्शन घडते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या