Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक...! बल्लारपूर राजुरा परिसरात भूकंपाचे 2 सौम्य धक्के, भविष्यात भूकंपाची तिव्रता वाढण्याची शक्यता...! (Shocking...! Two mild earthquake tremors in the Ballarpur-Rajura area; possibility of increased intensity in the future...!)

धक्कादायक...! बल्लारपूर राजुरा परिसरात भूकंपाचे 2 सौम्य धक्के, भविष्यात भूकंपाची तिव्रता वाढण्याची शक्यता...! (Shocking...! Two mild earthquake tremors in the Ballarpur-Rajura area; possibility of increased intensity in the future...!)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरात आज सायंकाळी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. पहिला धक्का सायंकाळी ४ वाजून १४ मिनिटे १८ सेकंदांनी, तर दुसरा धक्का ५ वाजून ३० मिनिटे ३९ सेकंदांनी नोंदविण्यात आला. या दोन्ही भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ३.२ आणि २.८ इतकी होती. भूकंपाच्या नोंदीनुसार, पहिल्या धक्क्याचे केंद्र १९.८७४ उत्तर अक्षांश आणि ७९.२३५ पूर्व रेखांशावर होते. या भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर नोंदविण्यात आली. दुसऱ्या भूकंपाचे केंद्र १९.८३४ उत्तर अक्षांश आणि ७९.४४३ पूर्व रेखांशावर होते. त्याची खोली जमिनीखाली १० किलोमीटर नोंदविण्यात आली. दोन्ही भूकंपांचे केंद्र बल्लारपूर-राजुरा परिसरात असल्याची माहिती आहे. बल्लारपूर आणि राजुरा परिसरात कोळसा खाणींचे मोठे जाळे असल्याने खाणकामाचा भूगर्भातील पाण्याच्या हालचालींवर आणि जमिनीच्या अंतर्गत रचनेवर होणारा परिणाम अभ्यासणे महत्त्वाचे ठरणार आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्यांचे नेमके कारण स्पष्ट व्हावे, यासाठी संबंधित भूगर्भशास्त्रीय यंत्रणांनी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. 
       ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूरचे अध्यक्ष तथा पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी या भूकंपांच्या घटनांबाबत महत्त्वपूर्ण भौगोलिक कारण स्पष्ट केले आहे. नद्या आणि खाणकामामुळे निर्माण होणाऱ्या भूगर्भातील बदलांसारख्या नैसर्गिक व मानवी हस्तक्षेपाशी संबंधित प्रक्रियांमुळे अशा प्रकारचे भूकंप होऊ शकतात. या प्रक्रियेला हायड्रोसिस्मिसिटी (Hydroseismicity) असे म्हणतात. भूगर्भातील पाण्याची हालचाल, जमिनीच्या आतील पोकळ्यांमध्ये पाणी शिरणे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या दाबातील बदलांमुळे भूकंपीय हालचाली घडू शकतात, असे प्रा. चोपणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, बल्लारपूर परिसर हा पारंपरिकदृष्ट्या भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत नसला तरी भौगोलिक परिस्थिती आणि मानवी हस्तक्षेपामुळे येथे भूकंपाचे धक्के जाणवू शकतात. चंद्रपूर जिल्ह्यात मूल, गोंडपिंपरी आणि सिरोंचा ही क्षेत्रे टेक्टॉनिक म्हणजेच भूगर्भातील भूस्तरांच्या हालचालींशी संबंधित भूकंप क्षेत्रे असल्याचे प्रा. चोपणे यांनी स्पष्ट केले. आज सायंकाळी जाणवलेल्या भूकंपांची तीव्रता कमी असली तरी भविष्यात अशा भूकंपांची तीव्रता ४ रिश्टर स्केलपर्यंत पोहोचू शकते, अशी शक्यताही प्रा. चोपणे यांनी व्यक्त केली. त्यामुळे बल्लारपूर परिसरातील भूकंपाच्या घटनांकडे केवळ किरकोळ नैसर्गिक घटना म्हणून न पाहता त्यामागील भूगर्भीय बदलांचा अभ्यास करण्याची गरज आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या