Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी नियमित स्वच्छता करावी - झाशी राणी सांस्कृतिक मंडळाची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी (Statues of great historical figures in the city of Ballarpur should be cleaned regularly on the fourth Saturday of every month — demand made by the Jhansi Rani Sanskrutik Mandal to the Chief Officer via a formal submission.)

बल्लारपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी नियमित स्वच्छता करावी - झाशी राणी सांस्कृतिक मंडळाची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी (Statues of great historical figures in the city of Ballarpur should be cleaned regularly on the fourth Saturday of every month — demand made by the Jhansi Rani Sanskrutik Mandal to the Chief Officer via a formal submission.)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख, अस्मिता आणि नागरिकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे पावित्र्य व सन्मान कायम अबाधित राहावा, यासाठी त्यांची दर महिन्याला नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी आग्रही मागणी झाशी राणी सांस्कृतिक मंडळ, बल्लारपूरचे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष या गंभीर बाबीकडे वेधले आहे. बल्लारपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच मुख्य नगर परिषद चौकात विराजमान असलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे, तसेच वस्ती विभागातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा हे संपूर्ण बल्लारपूरकरांसाठी अत्यंत श्रद्धेचे, आदराचे आणि स्फूर्तीचे केंद्र आहेत. दररोज हजारो नागरिक या मार्गावरून ये-जा करत असतात आणि या महापुरुषांना अभिवादन करतात. 
           मात्र, शहरातील वाढते प्रदूषण, वाहनांची वर्दळ आणि वातावरणातील धुळीमुळे या पुतळ्यांवर व सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचते. केवळ जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्तानेच पुतळ्यांची स्वच्छता केली जाते, मात्र इतर वेळी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांची कोणत्याही प्रकारे विटंबना किंवा अवहेलना होऊ नये, तसेच या पवित्र वास्तू नेहमीच स्वच्छ आणि सुंदर राहाव्यात, या उदात्त उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी या तिन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांची आणि परिसराची विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी रोहन कळसकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये पुतळ्यांची पाण्याने धुलाई करणे, चबुतऱ्याची स्वच्छता ठेवणे आणि परिसरातील कचरा नियमित उचलणे या बाबींचा समावेश असावा, असेही त्यांनी सुचवले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी या सामाजिक व संवेदनशील मागणीची तात्काळ दखल घेऊन पुतळ्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा व कर्मचारी नेमावेत, अशी अपेक्षा रोहन कळसकर यांनी व्यक्त केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या