Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई, एमडी ड्रग्ससह दोन आरोपींना अटक; १९.२२० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त (Major action by Chandrapur City Police: two suspects arrested with MD drugs; 19.220 grams of the narcotic substance seized.)

चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई,  एमडी ड्रग्ससह दोन आरोपींना अटक; १९.२२० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त (Major action by Chandrapur City Police: two suspects arrested with MD drugs; 19.220 grams of the narcotic substance seized.)

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व सेवनाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण १९.२२० ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत ४२ हजार २८४ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. विश्वसनीय सूत्राद्वारे प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे घरझडती दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी स्टाफला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर येथील आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली. या घरझडतीदरम्यान पोलिसांना एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी तत्काळ मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. 
                            अटक करण्यात आलेले आरोपी 
शुभम संजय वासेकर (वय २४ वर्षे),  व्यवसाय मजुरी, रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर. संजय महादेव वासेकर (वय ५२ वर्षे) व्यवसाय मजुरी, रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर. दोन्ही आरोपींविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत कलम ८(क) व २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात सहभागी असणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, पोलीस हवालदार संजय धोटे, संतोष दंडेवार, नापोअ कपुरचंद खरवार, पोलीस अंमलदार योगेश पिदुरकर, खंडेराव माने, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, प्रशांत कुसारे, सुशांत घिवे, महिला पोलीस अंमलदार लीना काटवले व पोलीस स्टाफ यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या