धक्कादायक...! चंद्रपुरात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मारक परिसरात व रेल्वे ट्रक जवळ मानवी अवशेष आढळल्यामुळं खळबळ (Shocking...! Discovery of human remains near the Priyadarshini Indira Gandhi Memorial premises and the railway tracks in Chandrapur causes a stir.)
चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मारक परिसरातील हत्या झालेल्याची ओळख पटली मृतक बंगाली कॅम्प निवासी 70 वर्षीय प्रभास सरकार असल्याची माहिती
चंद्रपूर : शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळा परिसराजवळ शीर आणि रेल्वे ट्रॅकजवळ मानवी धडा सह अवशेष आढळून आल्याने चंद्रपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे अवशेष पुरुषाचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकजवळ मानवी शरीराचे अवशेष असल्याची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलीस ठाणे आणि रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस पथक ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या सहाय्याने पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आढळलेले अवशेष कोणत्या पुरुषाचे आहेत, त्याची ओळख काय, तसेच मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ही घटना हत्या आहे की रेल्वे अपघाताशी संबंधित आहे, या सर्व शक्यतांच्या ही अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. चंद्रपूर शहराच्या मध्यभागी घडलेल्या अशा घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास शहर पोलीस रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा कडून संयुक्तपणे सुरू असून या प्रकरणाचे सत्य समोर आणण्याचे आवाहन आहे. सुरुवातीला, मृताची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते. तथापि, रामनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे, काही तासांतच मृताची ओळख बंगाली कॅम्प येथील रहिवासी, ७० वर्षीय प्रभास सरकार म्हणून पटली. पोलीस आता या रहस्यमय मृत्यूमागील परिस्थितीचा तपास करत आहेत. तपासात असे उघड झाले की, बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेले प्रभास सरकार ११ नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडले होते, परंतु परत आले नाहीत. यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी १३ नोव्हेंबर रोजी रामनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. उपलब्ध माहिती आणि परिस्थितीच्या आधारे, पोलिसांनी मृताची ओळख प्रभास सरकार म्हणून त्वरित पटवली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती एका पायाने अपंग होते. त्यांची ओळख पटल्यामुळे, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण निश्चित करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे झाले आहे. रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा मृताच्या मृत्यूशी संबंधित सर्व बाबींचा तपास करत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडल्यापासून ते मृतदेह सापडेपर्यंतच्या घटनांमधील दुवे जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या मध्यभागी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणि चर्चा निर्माण झाली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, प्रभास सरकारच्या मृत्यूमागे काय रहस्य आहे?
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

0 टिप्पण्या