Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

गोंडवाना विद्यापीठा तर्फे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या परिप्रेक्ष्यात विकसित विदर्भासाठी शिक्षण’ ज्ञानसभा-२०२६’ चे आयोजन (Gondwana University to host 'Dnyansabha-2026' (Knowledge Assembly-2026) on November 18, 2026, themed 'Education for a Developed Vidarbha' within the framework of the National Education Policy (NEP) 2020.)

गोंडवाना विद्यापीठा तर्फे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या परिप्रेक्ष्यात विकसित विदर्भासाठी शिक्षण’ ज्ञानसभा-२०२६’ चे आयोजन (Gondwana University to host 'Dnyansabha-2026' (Knowledge Assembly-2026) on November 18, 2026, themed 'Education for a Developed Vidarbha' within the framework of the National Education Policy (NEP) 2020.)

गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि शिक्षण संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘गडचिरोली ज्ञानसभा-२०२६’ चे आयोजन विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UIT) चे परिसरात सकाळी ९ वाजता करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या परिप्रेक्ष्यात विकसित विदर्भासाठी शिक्षण’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय संगोष्ठी आयोजित करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय संगोष्ठीचा प्रमुख उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन, गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण तसेच विदर्भाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाची भूमिका यावर व्यापक विचारमंथन करणे हा आहे. स्थानिक गरजा, उपलब्ध नैसर्गिक व सांस्कृतिक संसाधने, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून शिक्षणाच्या नव्या दिशा निश्चित करण्यावरही या परिषदेत भर दिला जाणार आहे.
           या संगोष्ठीचे उद्घाटक तसेच मुख्य वक्ता शिक्षण संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक अतुलजी कोठारी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहतील. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संगोष्ठीच्या समारोपीय सत्राला लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रभाकरनजी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय संगोष्ठीमध्ये भारतीय ज्ञानपरंपरा, उद्योजकता व कौशल्य विकास, उच्च शिक्षण, सामाजिक सहभाग आणि विदर्भाच्या विकासात शिक्षणाची भूमिका अशा विविध विषयांवर तज्ज्ञ विचार मांडणार आहेत. विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यांना या ज्ञानसभेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून डॉ. प्रशांत ठाकरे तर सहसंयोजक म्हणून डॉ. प्रितेश जाधव कार्य पाहत आहेत. या आयोजनाच्या यशस्वितेसाठी विद्यापीठ प्रशासन आणि शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. विदर्भाच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या या ज्ञानसभेत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या