सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी अभिवादन (Tribute paid to Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri on their birth anniversaries at the Public Works Department, Ballarpur.)
गांधीजींनी सत्य-अहिंसाचा पुरस्कार केला तर शास्त्रीजींच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेच्या आदर्श
बल्लारपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांसह माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेच्या आदर्शांना उजाळा देत सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर येथे गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप दिले, तर शास्त्रीजींनी अत्यंत साध्या जीवनशैलीतून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचे उदाहरण घालून दिले. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे महत्त्व अधिक असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या मूल्यांचा अंगीकार करणे गरजेचे आहे, असे मेंढे यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा संदर्भ देत सार्वजनिक ठिकाणे, कार्यालयीन परिसर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांच्या सहभागातूनच स्वच्छ आणि सुंदर समाजाची निर्मिती होऊ शकते, असा संदेशही यावेळी देण्यात आला. त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात निष्ठेने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले. सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा ही मूल्ये समाजाच्या प्रगतीसाठी आजही तितकीच महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. गांधीजी आणि शास्त्रीजींच्या विचारांचा वारसा जपत जबाबदारीने कार्य करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाला बल्लारपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता वैभव जोशी, अभियंता पवन सावरकर, अभियंता अनिल आंबटकर, अभियंता विनायक काकडे, अभियंता हनीफ कुरेशी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी अरविंद कुचनकर, राहुल कुंदोजवार, परिवर्तन वरखेडे, शीतल पोडे, माधवी मेश्राम, हरिदास डंबारे, बावणे, गिरडकर, सौदागर, महेश उईके, प्रसाद कातपातल ई उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या