नागपूर -: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे दरवर्षी असंख्य अनुयायी येत असतात. त्यांच्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. यावर्षी पहिल्यांदाच लांबून येणाऱ्या अनुयायांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी २३ हजारावर अनुयायी थांबू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. निवास व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यात सामाजिक न्याय भवन, दीक्षाभूमी परिसर, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीचा परिसर, आयटीआय इमारत, जिल्हा हिवताप कार्यालय, कुर्वेज शाळा, उंटखाना, बेझनबाग, ड्रॅगन पॅलेस कामठी याठिकाणी एकून २१ निवास कक्षात प्रत्येकी एक हजार याप्रमाणे २१ हजार अनुयायांची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय सामाजिक न्याय भवन येथे प्रत्येकी ७०० क्षमतेचे दोन निवास कक्ष तर विदर्भ विकास महामंडळ येथे ७०० याप्रमाणे २ हजार १०० अनुयायांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. Qनिवास कक्षाच्या ठिकाणी अनुयायांसाठी फॅन, कुलर, शुद्ध पिण्याचे पाणी तसेच मोबाईल चार्जींगसाठी सॅाकेटची व्यवस्था राहणार आहे. प्रत्येकास स्वच्छ अंथरून, पांघरून व आवश्यक बेडींग सुविधा, अखंडीत वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अनुयायांच्या काही समस्या असल्यास त्याच्या तत्काळ सोडवणूकीसाठी प्रत्येक कक्षात तक्रार निवारण कक्ष, माहिती व मार्गदर्शन सुविधा, तक्रार नोंदणी व निवारण व्यवस्था राहणार आहे. सोईसाठी प्रत्येक कक्षास नावे देण्यात आली आहे. लहान बाळांसह येणाऱ्या मातांना सुविधा
आपल्या लहान बाळांसह येणाऱ्या महिला अनुयायांसाठी विशेष व्यवस्था निवास कक्षात राहणार आहे. बाळ असलेल्या महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छ, सुरक्षित आणि गोपनीय कक्ष, आवश्यक साहित्य व आराम सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक कक्षात महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन बसविण्यात येणार आहे.
भिमसृष्टी बाबासाहेबांच्या विचारांचे दालन डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्वच घटक तसेच क्षेत्रासाठी प्रचंड काम केले. त्यांचे सामाजिक काम, विचारांचे दर्शन घडविण्यासाठी प्रत्येक निवास कक्षात भिमसृष्टी नावाचे दालन, प्रदर्शन उभारण्यात येणार आहे. याठिकाणी बाबासाहेबांचे विचार व जीवनप्रवासाची माहिती, साहित्य, चित्रफित राहणार असून प्रेरणादायी वातावरण निर्माण केले जातील. निवास सुविधेसाठी प्रशासनाचा पुढाकार धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे देशभरातून अनुयायी येतात. हजारो अनुयायी लांबचा प्रवास करून येत असल्याने त्यांची निवास व इतर अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची संकल्पना सादर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच निवास व इतर आवश्यक सुविधा उभ्या राहिल्या आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या