Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा (National Service Scheme (NSS) Foundation Day celebrated with enthusiasm at Mahatma Phule College.)

महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा (National Service Scheme (NSS) Foundation Day celebrated with enthusiasm at Mahatma Phule College.)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योंजना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला रासेयो चे उद्दिष्ट हे " माझ्यासाठी नसून तर समाजासाठी चे कर्तव्य असते व मी समाजासाठी पूर्णपणे आत्मसमर्पित वाहून घेईल हाच उद्देश असतो" अशा प्रकारचे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी श्री. विक्रम पांडे, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) विभागीय व जिल्हा प्रमुख यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली यावेळी विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून मा. विक्रम पांडे, सतिश नारायण, डॉ. पल्लवी जुनघरे, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. विनय कवाडे, सहकार्यक्रम अधिकारी रासेयो, प्रा. श्रद्धा कवाडे यांची उपस्थिती होती यासोबतच राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचीत्य साधून मान्यवर अतिथीनी करियर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन करतांना शिक्षण क्षेत्रासह रोजगारात नव्या संधी कशा निर्माण होतील यावर मार्गदर्शन केले. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या