Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपुरात उद्या २९ सप्टेंबरला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व नगर परिषद बल्लारपूर च्या संयुक्त विद्यमाने मोफत निदान व उपचार महाआरोग्य शिबिर (A mega health camp offering free diagnosis and treatment will be held in Ballarpur tomorrow, September 29, under the joint auspices of Acharya Vinoba Bhave Rural Hospital, Sawangi (Meghe), and the Ballarpur Municipal Council.)

बल्लारपुरात उद्या २९ सप्टेंबरला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व नगर परिषद बल्लारपूर च्या संयुक्त विद्यमाने मोफत निदान व उपचार महाआरोग्य शिबिर (A mega health camp offering free diagnosis and treatment will be held in Ballarpur tomorrow, September 29, under the joint auspices of Acharya Vinoba Bhave Rural Hospital, Sawangi (Meghe), and the Ballarpur Municipal Council.)

बल्लारपूर :- आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) (अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन रिसर्चद्वारा संचालित) आणि महिला व बाल कल्याण समिती, नगर परिषद बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी विद्यालय, जुना बसस्थानक, बल्लारपूर येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणी करण्यात येणार आहे. या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांकडून विविध आजारांची तपासणी करण्यात येणार असून रक्तदाब, रक्तातील साखर, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे तसेच दीर्घकाळ ताप येणे आदी आजारांवर मार्गदर्शन व उपचार केले जाणार आहेत. याशिवाय नेत्ररोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा आणि त्वचारोग तज्ज्ञांचीही सेवा उपलब्ध राहणार आहे. मोतिबिंदू, तिरळेपणा, हर्निया, हायड्रोसिल, अंगावरील गाठी, मुतखडा, पोटाचे आजार, गलगंड व थायरॉईड, महिलांचे विविध आजार, बालकांमधील हृदयातील छिद्र, कुपोषण, संधिवात, फ्रॅक्चर, मणक्याचे आजार, त्वचेचे विकार आदींची तपासणी केली जाणार आहे. 
         या शिबिरात नोंदणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी मोफत राहणार आहे. उपचारासाठी रुग्णालयात भरती होणाऱ्या पात्र रुग्णांना आवश्यक सामान्य चाचण्या, एक्स-रे, लघवी तपासणी, सोनोग्राफी, खाट व भोजन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेल्या सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या अतिविशिष्ट तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत पात्र असलेल्या इतर उपचार व शस्त्रक्रियांचाही लाभ मिळणार आहे. स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरच्या तपासणीची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. पात्र रुग्णांना आवश्यकते नुसार विविध शस्त्रक्रिया व पुढील उपचार मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या शस्त्रक्रिया, अंगावरील गाठी, थायरॉईड, हर्निया, हायड्रोसिल, कान-नाक-घसा, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, बालकांच्या हृदयातील छिद्रावरील उपचार, हाडांचे फ्रॅक्चर, मेंदू व हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी, कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा तसेच फाटलेले ओठ, दुभंगलेले टाळू आणि जन्मजात मुखविकृती वरील शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. शिबिरातून रुग्णालयात भरती होण्यासाठी सांगण्यात आलेल्या रुग्णांसाठी रुग्णालयात जाण्याची मोफत वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. संबंधित रुग्णांनी आधार कार्ड, राशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड तसेच राशन कार्डवर नाव असलेल्या सदस्यांचे आधार कार्ड यांच्या सत्यप्रती सोबत आणाव्यात. रुग्णालयात उपलब्ध नसलेल्या तपासण्या, औषधे किंवा आरोग्य सेवांचा खर्च संबंधित रुग्णांना स्वतः करावा लागणार असून शिबिरातील सवलतीचा कालावधी एक महिन्याचा राहणार आहे. बल्लारपूर शहरातील महिला, भगिनी तसेच सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. अल्का वाढई, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य,  मुख्याधिकारी विशाल वाघ, महिला व बाल कल्याण सभापती ॲड. मेघा भाले आणि उपसभापती शिल्पा चुटे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या