Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे निवेदन (Memorandum submitted by the Vanchit Bahujan Yuva Aghadi at the District Collector's Office, Chandrapur, regarding the death of Sahil Wakode.)

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे निवेदन (Memorandum submitted by the Vanchit Bahujan Yuva Aghadi at the District Collector's Office, Chandrapur, regarding the death of Sahil Wakode.)

चंद्रपूर : IIT मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी निष्पक्ष व वेळबद्ध CBI चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी मॅडम, चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोप, त्यांच्या चारित्र्याबाबत प्रसारित झालेली माहिती तसेच कुटुंबीयांनी केलेले जातीय भेदभाव, अपमान व मानसिक छळाचे आरोप यांची स्वतंत्र चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये होणारा जातीय भेदभाव हा गंभीर विषय असून कोणत्याही विद्यार्थ्याला न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
1. साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध CBI चौकशी करण्यात यावी.
2. परीक्षेतील गैरप्रकाराच्या आरोपांची पार्श्वभूमी, पुरावे व प्रशासनाच्या कार्यवाहीची सखोल चौकशी व्हावी.
3. कुटुंबीयांनी केलेल्या जातीय भेदभाव, अपमान व मानसिक छळाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी व्हावी.
4. चुकीची, खोटी माहिती प्रसारित झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी.
5. प्रो. सूर्यकुमार डुल्ला यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असल्यास तात्काळ अटक करण्यात यावी.
6. IIT मुंबईसह सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये SC, ST, OBC प्राध्यापकांची आरक्षणानुसार प्रलंबित भरती तातडीने पूर्ण करावी.
7. IIT कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करावी.
8. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी संविधानिक मूल्ये, समानता व विद्यार्थी अधिकारांबाबत प्रशिक्षण सुरू करावे.
9. जातीय भेदभावाच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाहीसाठी स्पष्ट SOP तयार करावी.
10. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, कोणालाही संस्थात्मक संरक्षण देऊ नये. "साहिल वाकोडे यांना न्याय मिळालाच पाहिजे! 
            यावेळी उपस्थित मान्यवर वंचित बहुजन युवा आघाडीचे अनिकेत गोडबोले, सिद्धांत पुणेकर, हर्षवर्धन कोठारकर, अभिलाष चुनारकर, नकुल कांबळे, प्रतीक वाघमारे, श्रुती दुर्गे, सुदेश शिंगाडे, प्रजय देवगडे, कुणाल उराडे, आनंद वासनिक, अजय उराडे, अविनाश वाळके, सिद्धार्थ भैसारे, राकेश पेटकर, राहुल गौरकार, डॉ. प्रज्ञाशील सहारे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कविताताई गौरकार, महानगराध्यक्ष तनुजाताई रायपुरे, मोनाली पाटील, अनिता खरतड, पुष्पा कोटांगले, दिलीप मेश्राम व इतर अनेक पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या