Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे यांना राज्य आदर्श प्राचार्य पुरस्कार, तर गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित (Dr. J. M. Kakade, Principal of Khatri College, has been honored with the State Ideal Principal Award, while Dr. Sanjay Gore, a Senate member of Gondwana University, has been honored with the Dr. J. P. Naik Ideal State Teacher Award.)

चंद्रपूर -: स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे सर यांची महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत असलेला डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि बहुमोल शैक्षणिक योगदान देणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांसाठी हा पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाकडून प्रदान करण्यात येत असतो. राज्यभरातून विविध विद्यापीठातील प्राचार्य व शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून यावर्षी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली मधुन उत्कृष्ट प्राचार्य म्हणुन हा पुरस्कार डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे यांना जाहीर करण्यात आलेला आहे.

         दिनांक ५ सप्टेंबर २०२६ ला संत ज्ञानेश्वर सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 

           महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे यांच्या या आदर्श प्राचार्य पुरस्कारबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एन. एच. खत्री सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्या या सत्काराबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन व कौतुक केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या