राजुरा :- वाढत्या वीज बिलांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता संविधान चौक, राजुरा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांनी केले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलकांनी वीज बिलांची होळी करून स्मार्ट मीटरची प्रतिकृती जाळली. यावेळी शहर अध्यक्ष प्रणय धोटे, महिला तालुका अध्यक्षा पुष्पा कोड़ापे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख भुवन सल्लम, बळवंत ठाकरे, जयभवानी कामगार संघटनेचे शहर अध्यक्ष रोहित बत्ताशंकर, कॉंग्रेस नेते मधु झाडे, सूरज चव्हाण, सदानंद गिरी, साहिल शेख, शहर उपाध्यक्ष नसीर शेख, विशाल ठाकुर, अतीक शेख, अयान शेख, अक्षय देवाळकर, शाहीन पठाण, गौतमी साखरकर, साहिल लोनगाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. नेत्यांनी सरकारने वीज दर कमी करावेत आणि स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या