Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अवैध देशी दारूच्या वाहतुकी करतांना एकास मुद्देमालसह अटक (Ballarpur police action: One person arrested along with the contraband while transporting illicit country-made liquor.)

बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अवैध देशी दारूच्या वाहतुकी करतांना एकास मुद्देमालसह अटक (Ballarpur police action: One person arrested along with the contraband while transporting illicit country-made liquor.)

बल्लारपूर :- पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. ०६/०८/२०२६ चे दुपारी १५:५७ वा. ते १६:२० वा. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीच्या खबरेवरून राजेंद्र प्रसाद वार्ड, मक्का मस्जिद ते नाग मंदीर कडे जाणाऱ्या रस्ताने एक ईसम हा आपले जांभळ्या रंगाची चारचाकी वाहनामध्ये अवैद्यरित्या दारु बाळगून जात आहे. अशा मुखबीरद्वारे मिळालेल्या खबरेवरून आम्ही, पंच व पोलीस स्टॉफ असे तपास साहित्यासह खाजगी वाहनाने मुखबिरानी दिलेल्या खबरे प्रमाणे राजेंद्र प्रसाद वार्ड, नाग मंदिर जवळील रस्तावर नाकाबंदी केली असता, एक जांभळ्या रंगाची टाटा कंपनीची इंडीगो मांझा वाहन क्रमांक MH-34 AA-6906 हे मक्का मस्जिद ते नागमंदिर कडे येणाऱ्या रोडने येताना दिसले. सदर वाहनास पंचासमक्ष पोस्टॉफ च्या मतदीने थांबवून त्यास आम्ही आमचा व पंचांचा परिचय देवुन त्याला त्यांचे नाव, गाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव ख्वाजा शेख उर्फ बडे मोहम्मद शेख, वय ५२ वर्षे, धंदा-मजूरी रा. साईबाबा वार्ड, भेंडे नाला, बल्लारपूर, ता. बल्लारपुर, जि. चंद्रपुर असे सांगीतले. नमुद इसमास त्याची गाडी थांबवीण्याचा उद्देश सांगून त्याचे टाटा कंपनीची इंडीगो मांझा वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याचे वाहनाचे मागील बाजुचा दरवाजा उघडून बघीतले असता, त्यामध्ये खाकी रंगाचे खरडयाचे बॉक्स दिसुन आले त्यापैकी एक बॉक्स पंचासमक्ष फाडून पाहिला असता, त्यामध्ये रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारु ९० एम.एल. नी भरलेल्या सिलबंद प्लॉस्टीक चापट शिशा दिसुन आले. तसेच वाहनाचे मधल्या भागाचा दरवाजा उघडून बघीतला असता, त्यामध्ये एका खाकी रंगाच्या खरडयाचे बॉक्स मध्ये विदेशी दारु Sahyandri GOLD PREMIMUM WHISKY कंपनीच्या १८० एम.एल. नी भरलेल्या सिलबंद काचेच्या शीशा तसेच MUMBAI MALT WHISKY कंपनीच्या ९० एम.एल. नी भरलेल प्लॉस्टीक चापट शिशा मिळून आल्या सदरचा देशी व विदेशीचा. माल असा एकुण ०३,२८,०७०/- रू चा मुद्देमाल अवैध्यरित्या मिळुन आला. सदरचा घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अप क ८२१/२०२६ कलम ६५ (अ) म.दा. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी सो. मा. अपर पो. अधिक्षक ईश्वर कातकडे सो., श्री. सुधिर नंदनवार सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक बिपीन इंगळे, पोलीस उप. निरिक्षक उमेश जोगदंड, पो.अ. महेश कुकुडकर /१५२७, फुलचंद लोधी/१६०१, शांतकुमार घोसे/९८३, लखन चव्हान/१२०२, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या