Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर तालुक्यात धक्कादायक प्रकार एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच वृत्त (In a shocking incident in Ballarpur Taluka, reports have emerged of the sexual assault of two minor students residing in an ashram school hostel.)

बल्लारपूर तालुक्यात धक्कादायक प्रकार एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच वृत्त (In a shocking incident in Ballarpur Taluka, reports have emerged of the sexual assault of two minor students residing in an ashram school hostel.)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या 11 व 7 वर्षांच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे जिल्हाभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित विद्यार्थ्यांवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे. यासंदर्भात पीडित विद्यार्थ्यांच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जुलै रोजी शाळेतील एका शिक्षकाने एका मुलाची प्रकृती बिघडल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. उपचार करूनही आराम मिळत नसल्याने दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या आजीकडे सोडले. त्यावेळी शाळा प्रशासनाकडून केवळ आजारपणाचे कारण सांगून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले होते. 
          विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने आजीने त्यांना रुग्णालयात नेले. याच दरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या आजीसमोर व नंतर आईसमोर वसतिगृहात घडलेला प्रकार सांगितला. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहातील दोन मोठ्या विद्यार्थ्यांनी रात्रीच्या वेळी त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला; तसेच या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी यापूर्वीही शाळेतील वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाहीच, उलट विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ प्रत्यक्ष आरोपींवरच नव्हे, तर आश्रमशाळेचे संबंधित अधिकारी, वसतिगृह प्रशासन आणि जबाबदार कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. घडलेला प्रकार समजल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आईने त्यांना उपचारासाठी प्रथम स्थानिक रुग्णालयात नेले. तेथून पुढील वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दाखल करून घेऊन उपचार सुरू केले असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर प्रकरण अधिक स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह पीडित मुलांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या