Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित (Anti-drug awareness program organized at Mahatma Jyotiba Phule College.)

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित (Anti-drug awareness program organized at Mahatma Jyotiba Phule College.)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामां विषयी विद्यार्थी व युवकांमध्ये जनजागृती व जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून बल्लारपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मा. मदन दिवटे साहेब उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सहकारी सचिन अल्लेवार साहेब व मोहगले मॅडम यांचीही उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत, अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच युवकांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. दिवाकर मोहितकर सर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप सोनोने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ललित गेडाम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. रोशन साखरकर, प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. डॉ. विनय कवाडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश मेश्राम यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण करण्याबरोबरच “व्यसनमुक्त युवक – सशक्त समाज” हा संदेश देण्यात आला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या